ETV Bharat / state

उदयनराजे-शिवेंद्रराजे समर्थकांमध्ये हाणामारी, माजी नगरसेवकासह चौघे जखमी; कोरेगावात तरूणाच्या दोन गटात राडा

साताऱ्यात निवडणुकीला गालबोट लावणाऱ्या दोन घटना बुधवारी घडल्या. उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली, तर कोरेगाव मतदारसंघातील एका गावात तरूणांचे दोन गट एकमेकांना भिडले.

Maharashtra Assembly Election 2024
उदयनराजे-शिवेंद्रराजे समर्थकांमध्ये हाणामारी (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

सातारा : विधानसभा निवडणुकी दिवशी शेवटच्या एका तासात सातारा आणि कोरेगाव तालुक्यात हाणामारीच्या दोन घटना घडल्या. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटात झालेल्या हाणामारीत माजी नगरसेवक वसंत लेवे यांच्यासह चौघे जखमी झाले. तसेच कोरेगाव मतदारसंघातील भोसे गावात मतदान यंत्रात बीप का वाजत नाही, असं विचारल्यावरून तरूणांच्या दोन गटात राडा झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी दिली.

शेवटच्या तासाभरात दोन ठिकाणी राडा : साताऱ्यातील बापूसाहेब चिपळूणकर मतदान केंद्रावरील मतदान संपल्यानंतर खा. उदयनराजे समर्थक माजी नगरसेवक वसंत लेवे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले समर्थक संजय लेवे यांच्या गटात किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. वसंत लेवे यांच्या डोक्यात रॉड घातला. या हाणामारीत वसंत लेवेंसह एकूण पाच जण जखमी झाले. या राड्यानंतर साताऱ्यात तणाव निर्माण झाला होता. शाहूपुरी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

उदयनराजे-शिवेंद्रराजे समर्थकांमध्ये हाणामारी (ETV Bharat Reporter)

"वसंत लेवे आणि संजय लेवे यांच्या गटात मारामारी झाल्यानंतर ते पोलीस स्टेशनला आले होते. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. तक्रार घेण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना पाठवले. परंतु, आम्हाला आत्ता तक्रार द्यायची नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यांनी तक्रार दिली नाही तरी पोलीस स्वतः फिर्याद देतील आणि संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल". - राजेंद्र सावंत्रे, पोलीस निरीक्षक, शाहुपुरी पोलीस स्टेशन

कोरेगावात तरूणांचे दोन गट भिडले : कोरेगाव मतदार संघातील भोसे (ता. खटाव) गावातील मतदान केंद्रावर सायंकाळी साडे पाचच्या सुमारास तरूणांच्या दोन गटात राडा झाला. मतदान यंत्रात बीप का वाजत नाही, अशी विचारणा काही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना केली. त्याचवेळी दोन्ही राजकीय गटातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर मतदान केंद्राच्या आवारात मारामारी झाली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. कोरेगाव पोलिसांची कुमक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर राडा करणाऱ्या तरूणांना ताब्यात घेण्यात आलं.

हेही वाचा -

  1. पालघरमधील वाढीव मतदानाचा फायदा कोणाला? महायुती, महाविकास आघाडी, की बहुजन विकास आघाडीला?
  2. छत्रपती संभाजीनगरमध्ये काही मतदार संघात कार्यकर्त्यांमध्ये राडा, दिवसभरात झाले 68.89% टक्के मतदान
  3. गौतम अदानी यांनी भारताला केले हायजॅक, अटक होणार नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.