ETV Bharat / state

अमरावतीत जुन्या वादातून दोन गटात सशस्त्र हल्ला; चौघे गंभीर जखमी - CLASH BETWEEN TWO GROUPS

अमरावतीत वैमनस्यावरून दोन गटात रविवारी हाणामारी झाल्याची घटना घडली. नांदगाव पेठ येथील शासकीय वसाहत परिसरात ही घटना घडली. यात चौघे जखमी झाले आहेत.

Clash Between Two Groups
दोन गटात हाणामारी (file Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 8, 2024, 10:01 PM IST

अमरावती : तांबे आणि शिंदे या दोन कुटुंबातील सदस्यांनी जुन्या वैमनस्यातून आधी शाब्दिक वाद घातल्यानंतर पुढे एकमेकांवर दगडफेक केली आणि नंतर सशस्त्र हल्ला केला. या घटनेत चार जण गंभीर जखमी झालेत. नांदगाव पेठ येथील शासकीय वसाहत परिसरात या घटनेमुळं खळबळ उडाली. घटनास्थळी दंगा नियंत्रण पथक तसेच पोलीस ताफा तैनात करण्यात आला.

अशी आहे घटना : नांदगाव पेठ येथील रहिवासी असणारे दादाराव शिंदे आणि मंगेश तांबे या दोघांमध्ये जुन्या एका प्रकरणातून रविवारी सकाळी वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचं रूपांतर हाणामारीत झालं. दरम्यान दादाराव शिंदे आणि रघुनाथ शिंदे या दोघांनी मंगेश तांबे आणि ईश्वर तांबे यांच्यावर सशस्त्र हल्ला चढवला. मंगेश तांबे याच्यावर चाकूनं गंभीर वार करण्यात आला. या घटनेची माहिती मिळतात नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या हाणामारीत जखमी झालेले दादाराव शिंदे, रघुनाथ शिंदे, मंगेश तांबे आणि ईश्वर तांबे या चौघांनाही पोलिसांनी तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. याबाबतची माहिती नांदगाव पेठ पोलिसांनी दिली.

परिसरात पोलीस तैनात : या घटनेनंतर नांदगाव पेठ येथील शासकीय वसाहत परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. तणावाची परिस्थिती पाहता दंगा नियंत्रण पथकासह अतिरिक्त पोलीस बंदोबस्त परिसरात तैनात करण्यात आला. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, फ्रेझरपुरा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कैलाश पुंडकर हे घटनास्थळी पोहोचले. दोन्ही कुटुंबाच्या वतीनं परस्पर तक्रारी देण्यात आल्या असून, पोलिसांनी या प्रकरणात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दोन कुटुंबातील वादामुळं ही संपूर्ण घटना घडली असून, आता परिसरात शांतता असल्याची माहिती नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांनी दिली.

हेही वाचा -

  1. मद्यपींनी वेटरवर फेकला ग्लास, पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की, तिघांना ठोकल्या बेड्या
  2. अनिल देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला; 'स्टंटबाजी' असल्याचा भाजपाचा आरोप, MVA चे नेते आक्रमक
  3. माथेफिरूनं घरात घुसून केला दोन चिमुरड्यांवर चाकू हल्ला, चिमुरड्यांवर मसिना रुग्णालयात उपचार सुरू - Knife attack on two children

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.