बीड Subhash Dudhaal : पुण्यातील सीआयडी विभागात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सुभाष भीमराव दुधाळ (वय ४२) यांचा मृतदेह परळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाखाली रेल्वे रुळावर आढळून आला आहे. शनिवारी सकाळी त्यांच्या मृतदेहाचे दोन तुकडे रेल्वे रुळावर आढळून आल्यानं पोलीस दलात खळबळ उडाली आहे. धुमाळ यांनी शुक्रवारी रात्री रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रेल्वे रुळावर आढळला मृतदेह : मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सात वाजता परळी रेल्वे स्टेशन मास्तरांनी रेल्वे रुळावर मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे, पोलीस उपनिरीक्षक साबळे, जमादार बाबासाहेब फड, राजू राठोड, सातपुते यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पोलिसांना परळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाखाली रेल्वे रुळावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. सुभाष भीमराव दुधाळ असं, मृतदेह आढळून आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी परळी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.
हत्या की आत्महत्या : सुभाष भीमराव दुधाळ यांनी आत्महत्या केली की, त्यांची हत्या झाली हे समजू शकलेलं नाही. ते परळीत का आले? याचाही तपास करण्यात येणार आहे.
काही दिवसापूर्वीच पुण्यात झाली बदली : सुभाष भीमराव दुधाळ यांची काही दिवसापूर्वीच बीडमधून पुण्याच्या सीआयडी विभागात पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली होती. मात्र, त्यांचा मृतदेह सापडल्यानं पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही सापडली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
हे वचालंत का :