ETV Bharat / state

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरुन पुन्हा राजकारण तापलं - shivaji maharaj Waghnkha

Shivaji Maharaj Waghnkha : लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझीअम येथून आणली जाणारी 'ती' वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत, असा दावा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केल्यानं आता राजकारण तापलं आहे.

Shivaji Maharaj Waghnkha
संग्रहित छायाचित्र (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 9, 2024, 10:19 PM IST

Updated : Jul 9, 2024, 10:29 PM IST

पुणे Shivaji Maharaj Waghnkha : लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझीअम येथून आणली जाणारी 'ती' वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत, असा दावा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी कागदपत्र समोर आणत केला आहे. यामुळं आता यावर पुन्हा राजकारण सुरु झालं असून आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. अश्यातच इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी याबाबत माहिती देत ते म्हणाले की, कोणालाही ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराज यांचीच आहे किंवा हीच वाघनखं अफजलखान वधाच्या वेळीस वापरली गेली हे सांगता येणार नाही. किंवा कुठल्याही राजघराण्यात असलेली वाघनखं ही देखील छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरली आहे हे सांगता येणार नाही. तसंच भवानी तलवारीच्या बाबत देखील संशोधकांचा तसंच मत आहे. या गोष्टी लोकांच्या मनातील श्रद्धा असून त्याला श्रध्देचा नुसार घ्यावं, असंही यावेळी बलकवडे म्हणाले.

वाघनखांवरुन पुन्हा राजकारण तापलं (ETV Bharat Reporter)

काय म्हणाले पांडुरंग बलकवडे : यावेळी इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे म्हणाले, "इंग्लंडच्या संग्रहालयात जी वाघनखं आहे, त्याबाबत जे आपल्याला पुरावे मिळतात त्यात असं आहे की शेवटचे छत्रपती प्रतापसिंह यांना इंग्रजांनी त्यांचा कारभारी म्हणून ग्रँड डफ यांची नेमणूक केली. यानंतर याच ग्रँड डफ आणि आणि छत्रपती यांच्यात चांगले रुनाणुबंध झाले. 1818 ते 1823 या काळात हा ग्रँड डफ साताऱ्यात इंग्रजांच्या वतीनं छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्याकडं कारभारी म्हणून होता आणि याच ग्रँड डफनं शास्त्राप्रमाणे मराठ्यांचा इतिहास पहिल्यांदा लिहिला. मग तो इंग्लंडमध्ये परत जाताना त्यानं छत्रपती प्रतापसिंह यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वापरातील काही वस्तू पैकी मला काहीतरी द्यावं ही विनंती केली. मग छत्रपती प्रतापसिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं वाघनखं त्यांना दिली."

पुराव्यानिशी आपलं मत मांडावं : पुढं बोलताना बलकवडे म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज यांची 'ती' वाघनखं घेऊन ग्रँड हा इंग्लंड ला गेला आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या नातवानं ती वाघनखं इंग्लंडच्या मुझियमला बक्षीस म्हणून दिली. एखादी वस्तू म्युझियम ला दिल्यावर त्याची नोंद होते, ही वस्तू कोणती आहे, याचा नेमकं इतिहास काय आहे. हे सगळं नोंद होत असते. आता इंग्लंड मधील विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझीअम इथं अशी नोंद देखील आहे. अनेक लोक जेव्हा तिथं भेट देत असतात तेव्हा ते श्रध्देने तिथं जाऊन वाघनखं आणि भवानी तलवारीचे दर्शन घेत असतात. आता या वाघनखांबाबत ज्यांचं कोणाचं जे काही मत असतील ते त्यांनी पुराव्यानिशी मांडल पाहिजे," असं यावेळी बलकवडे म्हणाले.

संभाजी ब्रिगेड आक्रमक : छत्रपती शिवाजी महाराजांची 'वाघनखं' ही लंडनच्या म्युझियममध्ये आहेत आणि ती भारतात आणायची आहेत असं सांगून महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जगजाहीर केले. त्यासाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च सुद्धा लागणार आहे. मात्र लंडनच्या म्युझियमशी पत्र व्यवहार केल्यानंतर समजलं की ती खरी वाघनखं आहेत हे सांगू शकत नाही. इतिहासाच्या काही महत्त्वाच्या गोष्टीबद्दल सरकार नेहमीच दिशाभूल करत आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा व सत्य इतिहास जगासमोर आला पाहिजे. त्यांची अस्सल संसाधनं समकालीन पत्रव्यवहार, साधनं यांचं जतन केलं पाहिजे. सरकार आजपर्यंत करु शकलेलं नाही. गड किल्ले ओस पडले. म्हणून संभाजी ब्रिगेडची पहिल्यापासून ठाम मागणी आहे, इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे आणि खरा इतिहास जगासमोर आला पाहिजे यासाठी सरकारनं प्रयत्न करावा, असं मत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा :

  1. लंडन येथून आणली जाणारी 'ती' वाघनखं शिवरायांची नाहीत, इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांचा दावा काय? - indrajit sawant claim

Last Updated : Jul 9, 2024, 10:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.