ETV Bharat / state

छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम रांगोळीच्या माध्यमातून रेखाटला, पहा व्हिडिओ - शिवाजी महाराज रांगोळी

Shivaji Maharaj Jayanti 2024: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उद्या मोठ्या थाटामध्ये साजरी होणार आहे. त्याच अनुषंगाने बीडच्या सौ के एस के महाविद्यालयमध्ये विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द ही रांगोळीच्या माध्यमातून साकारली आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी किल्ल्यावर जन्मले, याचीदेखील एक रांगोळी काढण्यात आली.

Student sketched Chhatrapati Shivaji Maharaj
छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 18, 2024, 4:26 PM IST

रांगोळी साकारण्यामागील अनुभव सांगताना प्राचार्या आणि विद्यार्थिनी

बीड Shivaji Maharaj Jayanti 2024 : शिवरायांच्या रांगोळीमध्ये बाल शिवराय कसे होते? त्यानंतर त्यांनी अभिषेक कसा केला? ही माहिती सुंदर अशा रांगोळीच्या रेखाटनातून दिलीय. त्याचप्रमाणं छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभा केलेले सागरी आरमार, अफजलखानाचा वध केला याचंदेखील रांगोळीच्या माध्यमातून रेखाटन केलं आहे. या बाल कलाकारांनी अत्यंत सुंदर असे रेखाटन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाचे संपूर्ण रेखाटन या रांगोळीच्या माध्यमातून केले आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीपा क्षीरसागर यांनी यावेळी विद्यार्थ्यांचे कौतुक केलं.

विविध कार्यक्रमांची रेलचेल: ''छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हटली की, कार्यक्रमांची रेलचेल असते. याच कार्यक्रमांमध्ये रांगोळी स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा असे विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. रांगोळी स्पर्धेत कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटन केलेले आहे'', असे डॉ. योगेश क्षीरसागर म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि ते छायाचित्र रेखाटण्याचं काम मी आज केलं आहे. ही रांगोळी रेखाटण्यासाठी तीन तास लागले आहेत. सर्वांत जास्त वेळा माॅंसाहेब जिजाऊंच्या रांगोळीला लागला आहे. शिवाजी महाराजांचे हावभाव, जिजाऊंच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे रेखाटण्यासाठी मला फार वेळ लागला. पण मला फार आनंद होत आहे की, मी आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव या ठिकाणी रेखाटण्याचं काम केलं आहे.'-- प्रिया औताणे ,विद्यार्थिनी

शिवरायांचं काम ''न भूतो न भविष्यती'': ''छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आहे. आदर्श राजा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. रयतेचा राजा आणि खरा जनतेचे कैवारी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ओळखले जातात. आज महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. त्यामध्ये रांगोळी स्पर्धेमध्ये आदर्श राजा कसा असावा, याचं चित्रण करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. या संदेशाची समाजामध्ये गरज आहे. जिजाऊ मॉंसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले. त्यातूनच शिवाजी महाराज घडले. त्यांनी त्यांच्याबरोबर विविध समाजातील समाज बांधव या राज्यनिर्मितीच्या कामात गुंतले होते. प्रत्येक जाती, धर्माचा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला मावळा म्हणून आपल्या सैन्यामध्ये सामावून घेतला होता. अन्याय-अत्याचाराच्या विरुद्ध लढा उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी अन्याय करणाऱ्या विरोधातच लढा उभा केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काम केलं ते 'न भूतो न भविष्यती' आहे'', असं प्राचार्या डॉ. दीपा क्षीरसागर म्हणाल्या.

''आम्ही आज रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. या स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज स्वारी करून गडावर जात असतानाचं छायाचित्र या ठिकाणी रेखाटण्यात आलं आहे. अशी विविध छायाचित्रं या ठिकाणी रेखाटण्यात आली आहेत.'' -- वैष्णव गौरी धनंजय, विद्यार्थिनी

हेही वाचा-

  1. इंदिरा गांधींचा तिसरा मुलगा कमल घेणार हातात 'कमळ'; नाथ सोडणार काँग्रेसचा 'हाथ'
  2. मातोश्रीच्या पायऱ्या कोण चढलं होतं?; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांसह अमित शाहांना सवाल
  3. काय सांगता! सनी लिओनीला व्हायचंय पोलीस? हॉल तिकीट पाहून अधिकारीही चक्रावले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.