नाशिक- महायुतीत मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज झालेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह असतानाही मंत्रिपद देण्यात आले नाही, असा त्यांनी आरोप केला.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिपद न मिळाल्यानं थेट अजित पवारांवर संताप व्यक्त केला. ते म्हणाले, "मी तुमच्या हातामधील लहान खेळणं आहे का? कुणी उठ, कुणी बस म्हटले तर करणारा छगन भुजबळ माणूस नाही. विधानसभेचे तिकीट देतानाही वाट पाहायला लावली. प्रत्येकाला मंत्रिपद हवे असते. प्रश्न मंत्रिपदाचा नाही, माझी अवहेला करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या मनात राग आणि निराशा आहे. माझा चांगला फायदा होईल, मला लोकसभेत जाऊ द्या, असे म्हटले होते. माझ्या मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचा आग्रह होता. मंत्रिपद कोणी नाकारले हे शोधावे लागेल".
सुसंस्कृतपणे भावना व्यक्त करा- राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ म्हणाले, " आलेल्या कार्यकर्त्यांनी माझ्यासमोर त्यांच्या वेदना आणि दुःख मांडले आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निराशा आहे. त्यांना जे घडले, ते मी सांगितले आहे. मी माझ्या मतदार संघात आज जात आहे. उद्या पुन्हा एक समता परिषेदेची बैठक आहे. सुसंस्कृतपणे आपल्या भावना व्यक्त करा, असे सांगितले. जोडे मारो आंदोलन करू नका, असे मी आवाहन केले".
प्रफुल पटेलांचा समीर भुजबळांची संपर्क- पुढे भुजबळ म्हणाले, " मी 40 वर्षांपासून मी इथे आहे. म्हणून मला राज्यसभा द्या, अशी माझी मागणी होती. पण आता मी आता लढलो. आता मला जाण्यासाठी सांगत आहेत. प्रफुल पटेल हे समीर भुजबळ यांच्या संपर्कात आहेत. ते त्यांच्याशी बोलत आहेत. तुम्हाला वाटेल तेव्हा मला वरती पाठवणार, वाटेल तेव्हा खाली आणणार का? मी तुमच्या हातातली खेळणी आहे का?" असा भुजबळांनी संतप्तपणे सवाल केला.
हेही वाचा-