लातूर NEET Paper Leak : वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG 2024 पेपर लीक प्रकरणाचा तपास करत असलेल्या CBI ला मोठं यश मिळालं आहे. तपास यंत्रणेनं सोमवारी लातूर येथून एका आरोपीला अटक केली. NEET-UG मध्ये कथित हेराफेरी प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. नानजुने धप्पा असं या आरोपीचं नाव असून तो विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन गुण वाढवण्याचा दावा करत होता.
आठवी अटक : NEET-UG परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणी सीबीआयनं केलेली ही आठवी अटक आहे. यापूर्वी, सीबीआयनं 3 जुलै रोजी झारखंडमधील धनबाद येथून NEET-UG प्रकरणातील अनियमिततेच्या संबंधात संशयित मुख्य सूत्रधाराला अटक केली होती. अमन सिंग असं त्याचं नाव आहे. याशिवाय, सीबीआयने गुजरातमधील गोध्रा येथून एका खासगी शाळेच्या मालकाला उमेदवारांकडून गुण वाढवण्याच्या बदल्यात पैशांची मागणी केल्याप्रकरणी अटक केली होती. पेपर लीक प्रकरणी सीबीआयनं एका हिंदी मीडिया संस्थेच्या मार्केटिंग व्यावसायिकालाही अटक केली आहे.
झारखंडमधून दोघं अटकेत : सीबीआयनं जूनमध्ये झारखंडमधील हजारीबाग येथील ओएसिस शाळेचे मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक म्हणून काम करणाऱ्या डॉ. एहसान उल हक आणि इम्तियाज आलम या दोन आरोपींना अटक केली होती. हक यांची NEET-UG परीक्षा 2024 साठी शहर समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. दोघांच्या अटकेनंतर केंद्रीय एजन्सीनं पाटण्यातील आणखी दोन आरोपी मनीष प्रकाश आणि आशुतोष यांना अटक केली होती, जे पटना येथून काम करत होते. सीबीआय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आशुतोष विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित घराची व्यवस्था करत होता, तर मनीष उमेदवारांना परीक्षेसाठी 'तयारी' करण्यासाठी शाळेत घेऊन जात होता. मनीष प्रकाश यानं विद्यार्थ्यांना आपल्या गाडीत बसवलं होतं आणि विद्यार्थ्यांना आशुतोषच्या घरी नेलं होतं.
अनेक एफआयआर : जूनच्या सुरुवातीला केंद्र सरकारनं NEET-UG परीक्षेतील गैरप्रकारांचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. यानंतर सीबीआयनं कथित पेपर लीक, डमी उमेदवार उभे करणे आणि फसवणुकीशी संबंधित अनेक एफआयआर नोंदवले होते.
हेही वाचा :