ETV Bharat / state

माढ्याचे खासदार निंबाळकरांच्या वाहनावर भाजपाच्याच कार्यकर्त्यांनी फेकली गाजरं, नेमकं कारण काय? - माढा लोकसभा मतदार संघ

Carrots Thrown On Vehicle : माढा लोकसभा मतदार संघातील भाजपाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना माढा दौऱ्यात भाजपा कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी रणजितसिंह यांच्या वाहनांच्या ताफ्यांवर गाजरं फेकून निषेध केलाय.

Carrots Thrown On Vehicle Of Madha Mp Ranjeetsingh Naik Nimbalkar by bjp supporters
माढ्याचे खासदार निंबाळकरांच्या वाहनावर भाजपाच्याच कार्यकर्त्यांनी फेकली गाजरं
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 3, 2024, 8:11 PM IST

सातारा Carrots Thrown On Vehicle : भाजपाचे माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपाच्याच कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या समवेत खासदार निंबाळकर हे रविवारी (3 मार्च) माढा तालुक्यात दौरा करत असताना त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर भाजपा कार्यकर्त्यांनी गाजरं फेकून निषेध केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं बघायला मिळतंय.

रस्त्यावर गाजरांचा खच : रांझणी-आलेगाव-गार अकोले-टाकळी-आढेगाव या नवीन रस्त्याच्या भूमिपूजनासाठी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार बबनराव शिंदे आले होते. त्यांच्यासोबत पोलिसांची सुरक्षा व्यवस्थाही होती. यावेळी पोलीस बंदोबस्तात निघालेल्या खासदार निंबाळकर यांच्या वाहनावर काही तरूणांनी तीन ते चार क्विंटल गाजरं फेकली. त्यामुळं रस्त्यावर गाजरांचा खच पडल्याचं बघायला मिळालं. तसंच भाजपाच्याच स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेल्या या प्रकारामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

वाहनावर गाजरं फेकण्याचं कारण काय? : या घटनेसंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना भाजपाचे कार्यकर्ते सतीश केचे म्हणाले की, "खासदार निंबाळकर यांच्या वागण्यानं आणि खोट्या बोलण्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाची प्रतिमा मलिन होत आहे." तसंच खोट्या वृत्तीचा निषेध नोंदविण्यासाठी त्यांच्या वाहनांवर गाजरं फेकल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

दौरा निर्विघ्न पार पडल्याचा खा. निंबाळकरांचा दावा : सदरील घटनेसंदर्भात विचारण्यात आलं असता खासदार निंबाळकर यांनी असा प्रकार घडलाच नसल्याचा दावा केला. तसंच आपला माढा तालुक्यातील दौरा निर्विघ्नपणे पार पडल्याचं ते म्हणाले. दरम्यान, भाजपा कार्यकर्त्यांमध्ये खासदार निंबाळकरांबद्दल रोष दिसून येत असल्यानं लोकसभा निवडणुकीत भाजपाची डोकेदुखी वाढणार असल्याचं चित्र दिसू लागलं आहे.

हेही वाचा -

  1. 'छोट्या राजनची नव्हती एवढी सहा फुटाच्या खासदाराची दहशत'; महायुतीच्या 'या' दोन नेत्यामंध्ये जुंपली
  2. माढा लोकसभा उमेदवारीवरून महायुतीत तणाव, रामराजे नाईक-निंबाळकरांनी दिला 'हा' इशारा
  3. उदयनराजे भोसले, रणजितसिंह निंबाळकरांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; मराठा आणि धनगर आरक्षणाची केली मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.