ETV Bharat / state

महाराष्ट्रात चाललंय काय? कोट्यवधींच्या ड्रग्जनंतर आता सोलापुरात तब्बल 459 किलो गांजा जप्त - टेंभुर्णी पोलीस

Cannabis Seized in Solapur : सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गांजा विरोधात मोठी कारवाई केलीय. आंध्रप्रदेशातून महाराष्ट्रातल्या बारामतीकडं जाणारा 459 किलो गांजा पोलिसांनी जप्त केलाय. याप्रकरणी सहा संशयितांना अटकही केलीय.

सोलापुरात तब्बल 459 किलो गांजा जप्त
सोलापुरात तब्बल 459 किलो गांजा जप्त
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 22, 2024, 12:05 PM IST

Updated : Feb 22, 2024, 12:29 PM IST

शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

सोलापूर Cannabis Seized in Solapur : राज्यात एकीकडे एमडी ड्रग्जच्या कारवाया होत असताना दुसरीकडं सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गांजाविरोधात मोठी कारवाई केलीय. सोलापूर पुणे महामार्गावर झालेल्या दोन कारवायांमध्ये सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेनं सहा संशयित आरोपीना अटक केलीय, तर तीन संशयित अजूनही फरार आहेत. या संशयित आरोपींकडून तब्बल 459 किलो गांजा जप्त केलाय. सोलापूर तालुका आणि टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या दोन कारवायांमध्ये पोलिसांनी सुमारे 1 कोटी 36 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. सोलापुरच्या इतिहासातली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जातंय.

सोलापूर पुणे महामार्गावर सापळा रचून कारवाई : सोलापूर तालुका ह‌द्दीतून एका चार चाकी वाहनांतून दोन व्यक्ती आंध्रप्रदेशमधून गांजा घेऊन बारामतीकडे जाणार असल्याची गोपनीय माहिती 19 फेब्रुवारी रोजी पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सोलापूर पुणे महामार्गावरील कोंडी गावाजवळ सापळा रचला. यात त्यांनी एका संशयित वाहनाला अडवून त्याला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता, त्यात 459 किलो 340 ग्रॅम गांजा आढळून आला. या प्रकरणी अल्ताफ युनुस इनामदार, जमीर इब्राहिम शेख या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 1 कोटी 46 हजार 900 रुपयांचा अवैध गांजा जप्त करण्यात आलाय.

जानेवारी महिन्यातही झाली होती कारवाई : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जानेवारी महिन्यात टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोडनींब ते जाधववाडी रस्त्यावर सापळा रचून दोन संशयित चारचाकी वाहनं ताब्यात घेतली होती. त्या दोन्ही वाहनांतून 105 किलो 380 ग्रॅम गांजा हस्तगत केला होता. यात पोलिसांनी 36 लाख 36 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. याप्रकरणी कदिर असिफ पठाण, प्रकाश संतोष बारटक्के, संतोष तुकाराम कदम, ऋषीकेश उर्फ बापू देवानंद शिंदे यांना अटक करण्यात आली होती.

हेही वाचा :

  1. मिठाच्या पिशव्यातून ड्रग्जची तस्करी; सांगलीत 300 कोटींचा एमडी ड्रग्जसाठा जप्त
  2. कुरकुंभ एमआयडीसीमधील अमली पदार्थांच्या उत्पादनाचे दिल्लीपर्यंत धागेदोरे, कुणाचा आहे वरदहस्त?
  3. पुणे पोलिसांचा नादच खुळा; दिल्लीत कारवाई करत तब्बल 1200 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त

Last Updated : Feb 22, 2024, 12:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.