नवी मुंबई Boyfriend murder by Brother : वडील आणि भावानं केलेल्या मारहाणीत एका तरूणीच्या प्रियकराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी नवी मुंबईत तळोजा परिसरात घडलीय. या प्रकरणी तरुणीच्या वडिलांना आणि भावाला अटक करण्यात आलय. कलम 302, 34 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
नेमकं प्रकरण काय : संबंधित तरुणी आपल्या कुटुंबीयांसह नवी मुंबई परिसरातील तळोजा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या देवीचा पाडा परिसरात राहातं होती. घरी कोणी नसल्याचं पाहून तरूणीनं आपल्या अठरा वर्षीय प्रियकराला घरी भेटण्यासाठी बोलावलं. त्याचं वेळी तरुणीचा भाऊ घरी आला. बराचवेळ दरवाजा वाजवून देखील तरुणीनं कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर भावानं दरवाजाला जोरदार धक्के दिले आणि जबरदस्तीनं तो आत गेला. आतमध्ये भावानं बहिणीला आणि तिच्या प्रियकराला सोबत पाहिलं आणि भावाचा राग अनावर झाला. त्यानं लगेच आपल्या वडिलांना फोन केला.
मारहाणीत प्रियकराचा मृत्यू : तरुणी आणि तिच्या 18 वर्षीय प्रियकराला एकत्र पाहून तरुणीचा भाऊ तसंच वडील प्रचंड संतापले. त्यांचा राग अनावर झाल्यानं वडील आणि भावानं तरुणीच्या प्रियकराला जबरदस्त मारहाण केली. या मारहाणीत तरुणीचा प्रियकर जागीच मृत्युमुखी पडला. या घटनेची माहिती तळोजा पोलीस ठाण्यात कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वडील, भावाला ताब्यात घेऊन प्रियकराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला.
तरुणीच्या वडील, भावाला अटक : तळोजा पोलिसांनी मुलीचे वडील, भाऊ यांना ताब्यात घेतलं असून दोघांवर कलम 302, कलम 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी नवी मुंबई परिमंडळ 2 च्या अंतर्गत येणाऱ्या तळोजा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा