मुंबई : कफ परेड येथील तीन महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणात आरोपी कन्हैया उर्फ कन्नू दत्ता चौघुलेला फाशिची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांनं चिमुरडीवर बलात्कार करून तिला मुंबईच्या खाडीत फेकलं होतं. चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या करणं अतिशय गंभीर गुन्हा आहे," असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. मात्र, आरोपीला उच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगीही देण्यात आली आहे.
चिमुरडीला लैंगिक अत्याचार : मुंबईतील एका झोपडपट्टीत आरोपी तन्नू उर्फ कन्हैया दत्ता चौगुले यानं एका चिमुरडीला लैंगिक अत्याचार करून तिला समुद्राच्या खाडीच्या फेकून दिलं होतं. या संदर्भात मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात 2021 साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या अंतिम सुनावणीदरम्यान सत्र न्यायालयानं आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तसंच उच्च न्यायालयात दाद मागण्याचा आरोपीचा अधिकार त्यांनी कायम ठेवला आहे.
पैसे देण्यास नकार दिल्यानं केली हत्या : ही घटना 2021 मध्ये मुंबईतील कप परेड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका वस्तीत घडली होती. 8 जुलै 2021 रोजी आरोपी कन्हैया उर्फ कन्नू हा तक्रारदाराच्या घरी पैशाची मागणी करण्यासाठी गेला होता. आरोपी हा तृतीयपंथी आहे. त्यानं नेहमीप्रमाणे पैशांची मागणी केली. मात्र, पीडित कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळं त्यांनी आरोपीला पैसे देण्यास नकार दिला होता. त्याचा राग मनात धरून आरोपींन चिमुरडीर लौंगिक आत्याचार करत तिची हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 302 कलम 376 ब तसंच ड, कलम 363, कलम 201, भारतीय दंड संहिता कलम 4, 6 8, 10 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे वाचलंत का :