ETV Bharat / state

कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ 'डॅडी' कायमचा सुटणार, न्यायालयानं सरकारला दिले 'हे' निर्देश - Arun Gawali

Arun Gawali : मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं मोठा दिलासा दिलाय. तो सध्या शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्ये प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. मात्र आता त्याची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.

Don Arun Gawali
अरुण गवळी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 7:44 AM IST

Updated : Apr 6, 2024, 3:05 PM IST

मीर नगमान अली, अरुण गवळीचे वकील

नागपूर Arun Gawali : शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं मोठा दिलासा दिलाय. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची तुरुंगातून मुदतपूर्व सुटका करा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले. 2006 च्या एका शासन निर्णयाच्या आधारे कुख्यात डॅान अरुण गवळीकडून शिक्षेतून सुट देण्याची मागणी करण्यात आली होती. अरुण गवळीच्या त्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र, कोर्टानं निकाल राखून ठेवला होता. त्यावर निर्णय देताना न्यायालयानं अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले. मात्र, त्या संदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासन आणि गृह विभागाला 4 आठवड्यांचा अवधीही दिलाय.

मुदतपूर्व सुटकेसाठी उच्च न्यायालयात घेतली होती धाव : शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात जन्मठेपेच्या शिक्षेत 14 वर्षे कारावास भोगल्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीनं उर्वरित शिक्षा माफ करावी, याकरिता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अरुण गवळीनं वयाची अट पूर्ण केल्याच्या कारणावरुन मुदतपूर्व सुटकेसाठी न्यायालयात अर्ज सादर केला होता. 2006 च्या शासन निर्णयाच्या आधारे जर एखाद्या कैद्यानं एकूण शिक्षेपैकी जर 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा पूर्ण केली असेल तर बंदिवान मुदतपूर्व सुटका होण्यास पात्र असल्याचा दाखल दिला होता.

अरुण गवळीवर हत्येचा आरोप : शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची मुंबईत 2 मार्च 2007 मध्ये हत्या झाली होती. रात्रीच्या वेळी कमलाकर जामसांडेकर हे घरी असताना त्यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणी पोलिसांनी अरुण गवळीला अटक केली होती, तेव्हापासून तो कारागृहात बंद आहे. मारामारी, अपहरण, खून यांसारख्या अत्यंत गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये अडकलेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यावर्षी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून पदवीधर झालाय. आपली सत्ता आणि वर्चस्व कायम ठेवण्यासाठी गुंडगिरीमध्ये 'पदव्युत्तर' राहिलेल्या अरुण गवळीला नागपूरच्या कारागृहात शिक्षणाचं महत्त्व उमगलं होतं. त्यामुळं त्यानं नागपूर मध्यवर्ती कारागृहात राहून पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण केलाय.

2006 चे महाराष्ट्र सरकारचे परिपत्रक काय : जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना 14 वर्षे तुरुंगवास पूर्ण केल्यावर, तसंच त्यांचं वय 65 पेक्षा जास्त असेल तर तुरुंगातून सोडता येईल. गवळीचा जन्म 1955 चा असल्यानं त्याचं वय सरकारनं जाहीर केलेल्या नियमांच्या अटीत बसत आहे. कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळी 2007 पासून तुरुंगात असल्यानं त्यानं गेली सोळा वर्ष तुरुंगवास भोगलाय.

हेही वाचा :

  1. Arun Gawli News : अरुण गवळीला नागपूर खंडपीठाकडून संचित रजा मंजूर, 'इतके' दिवस तुरुंगातून येणार बाहेर
  2. Arun Gawli : अरुण गवळींनी पाठवली अमेझॉन, व्हॉईस मीडियासह 'डिस्कवरी'ला नोटीस

Last Updated : Apr 6, 2024, 3:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.