मुंबई Bombay High Court : मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीकेसी परिसरातून जप्त करण्यात आलेल्या 41 आलिशान गाड्या परत करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं गुरुवारी मुंबई पोलिसांना दिले आहेत. जप्त करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये पोर्श, मर्सिडीज, फेरारी, ऑडी, लॅम्बोर्गिनी, जग्वार, बीएमडब्ल्यू गाड्यांचा समावेश आहे.
अलिशान कार परत कराव्यात : मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई, नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर काही कार मालकांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी सुरू झाली. यात आमच्या अलिशान कार परत कराव्यात तसंच पोलिसांनी नोंदवलेला प्रथम माहिती अहवाल रद्द करावा, अशीदेखील मागणी केली आहे.
कार चालकांकडून प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन : 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करणारा आदेश प्रजासत्ताक दिनापूर्वी जारी करण्यात आला होता. त्यावेळी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) ते मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जवळ प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीनं आयोजित केलेल्या रॅलीमध्ये या गाड्या सहभागी होणार होत्या. या कार्यक्रमात किमान 100 गाड्या सहभागी होण्याची शक्यता होती.
- कारचालकांवर गुन्हा दाखल : 'या इव्हेंटला कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळं पोलिसांनी कारचालक तसंच आयोजकांविरुद्ध कलम 188, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. 'कार चालकांनी प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केलं, म्हणून पोलिसांनी रॅली सुरू होण्यापूर्वीच कार जप्त करत कारवाई केली', असं पोलिसांनी म्हटलं होतं.
- कार परत करण्याचे निर्देश : त्यावर आज न्यायालयानं गुरुवारी दिलेल्या अंतरिम आदेशात पोलिसांना जप्त केलेल्या कार त्यांच्या मालकांना परत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच गन्हा रद्द करण्याबाबत सुनावणी होईल, असंही मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळं कार मालकांना दिलासा मिळाला आहे.
हे वाचलंत का :
- 'माझ्या हातातला झेंडा फडकला, अन् डोळ्याचं पारणं फिटलं'; सर्वात लहान कारसेविका म्हणून नोंद झालेल्या गीतांजली ठाकरेंनी दिला आठवणींना उजाळा
- 'ब्लॅक टेल', 'गोल्डन फ्लोअर' पक्षी झोडतात अमरावतीकरांचा 'पाहुणचार'; 64 परदेशी प्रजातींनी ठोकलाय तळ
- ''केंद्र सरकारच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो...'' सर्वसामान्य मुंबईकरांच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया