ETV Bharat / state

नागपुरातील विटांच्या कारखान्यात भीषण स्फोट; एका कामगाराचा मृत्यू तर नऊ जखमी - Nagpur Factory Blast - NAGPUR FACTORY BLAST

Nagpur Factory Blast : नागपूर जिल्ह्यातल्या मौदा तालुक्यातील एका वीट (Bricks Factory) कारखान्यात भीषण स्फोट झाला. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला, तर नऊ कामगार जखमी झाले आहेत.

Nagpur Factory Blast
नागपूरात फॅक्टरीत स्फोट (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 6, 2024, 9:37 AM IST

Updated : Aug 6, 2024, 1:03 PM IST

नागपूर Nagpur Factory Blast : जिल्ह्यातील एका वीटा कारखान्यात (Bricks Factory) मंगळवारी (6 ऑगस्ट) पहाटे स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मौदा तालुक्यातील युनिट येथे ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 'श्री जी ब्लॉक' या खासगी कारखान्यात हा स्फोट झाला. येथे सिमेंटच्या मोठ्या वीट बनवण्याचं काम केलं जातं.

नागपुरातील विटांच्या कारखान्यात भीषण स्फोट (ETV Bharat Reporter)

जखमींना रुग्णालयात केलं दाखल : एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, "मंगळवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास मौदा तालुक्यातील झुल्लर गावात असलेल्या वीट बनवण्याच्या कारखान्यात अचानक स्फोट झाला. त्यामुळं कारखान्याचे टिन शेड खाली कोसळलं. या स्फोटात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. नऊ कामगार जखमी आहेत. नंदकिशोर करंडे असं या मृतकाचं नाव आहे. गंभीर जखमींना उपचारासाठी नागपुरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं."

Nagpur Factory Blast
स्फोटामुळे मालमत्तेचे नुकसान (ETV Bharat Reporter)

कारखान्यात मोठा स्फोट : नागपुरात या आधीही अशीच एक घटना घडली होती. नागपूर-अमरावती मार्गावर असलेल्या धामणा इथल्या स्फोटक बनवणाऱया कंपनीत मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू तर 5 कामगार जखमी झाले होते.

Nagpur Factory Blast
मौदा तालुक्यातील विटा कारखान्यात स्फोट (ETV Bharat Reporter)

हेही वाचा -

नागपुरात स्फोटक पदार्थांच्या कंपनीत मोठा स्फोट; पाच कामगारांचा होरपळून मृत्यू - NAGPUR Blast

डोंबिवलीतील चायनीज सेंटरमध्ये सिलेंडरचा स्फोट, सात ते आठ जण गंभीर जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक - Cylinder blast in Dombivli

नक्षलवाद्यांनी घडवला आयएडी स्फोट; दोन जवानांना वीरमरण, चार जवान गंभीर - STF Jawans Martyred In IED Blast

Last Updated : Aug 6, 2024, 1:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.