ETV Bharat / state

विधानसभेसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? भाजपाच्या दाव्यानं शिवसेना, राष्ट्रवादीचं टेन्शन वाढण्याची शक्यता - Assembly Elections 2024 - ASSEMBLY ELECTIONS 2024

Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वांत जास्त जागा लढवेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महायुतीत भाजपा सर्वाधिक १५५ जागा लढवेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ६० ते ६५ जागा आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसला ५० ते ५५ जागा सोडण्यात येतील, अशी प्राथमिक चर्चा झाल्याचं वृत्त आहे.

Assembly Elections 2024
फाईल फोटो (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 23, 2024, 5:35 PM IST

मुंबई Assembly Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा राजकीय फटका बसल्यानंतर महायुतीतील भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांनी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीतील निकालाने धास्तावलेली महायुती आता विधानसभा निवडणुकीत छोट्या पक्षांसाठी देखील जागा सोडणार आहे. छोट्या पक्षांसाठी सुमारे १५ जागा सोडण्याबाबत विचार सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत काही जागांवर महायुतीचे जागावाटप शेवटच्या क्षणापर्यंत रखडले होते. काही ठिकाणी शिवसेनेला उमेदवार बदलण्याची वेळ आली. त्यामुळे प्रचाराला पुरेसा वेळ न मिळाल्याची तक्रार करण्यात आली. एकूणच महायुतीला मोठा फटका बसल्यानं खडबडून जागे झालेल्या महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी आतापासूनच निर्णय प्रक्रिया सुरू केली आहे.

शिवसेनेला हव्यात 100 जागा : जागावाटपामध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तिन्ही पक्षांचा जास्तीत जास्त जागांसाठी आग्रह आहे. शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेला विधानसभा निवडणुकीसाठी १०० जागा हव्या असल्याची मागणी केली आहे. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी देखील ८० जागांसाठी आग्रह असल्याचं वक्तव्य केलं होतं; मात्र नंतर त्यांनी शिवसेनेचे आणि आमचे जवळपास समान आमदार असल्याने शिवसेनेला जितक्या जागा मिळतील तितक्याच जागा मिळाव्यात अशी भूमिका घेतली होती. शिवसेनेला लोकसभेत जास्त जागा मिळाल्यानं त्यांना विधानसभेला जास्त जागा मिळाव्यात असे म्हणू नये, असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं होतं.

जाणून घ्या 2019चे पक्षीय बलाबल : राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार महायुतीमध्ये भाजपा मोठा भाऊ असल्याने भाजपा १५५ जागांवर लढेल, शिवसेनेला ६० ते ६५ जागा दिल्या जाऊ शकतात आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला ५० ते ५५ जागांवर समाधान मानावे लागेल, असं समोर येत आहे. २०१९ मध्ये विधानसभा निकालात पक्षीय बलाबल काय होते यावर नजर टाकल्यास भाजपाने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १६४ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी १०५ जागांवर विजय मिळवून विधानसभेतील सर्वांत मोठा पक्ष बनला होता. तर तेव्हा भाजपासोबत असलेल्या उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ५६ जागांवर विजय मिळवत द्वितीय स्थान मिळवले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसला ५३ तर कॉंग्रेसला ४५ जागांवर विजय मिळाला होता.

हेही वाचा :

  1. पावसाळ्यात घरांमध्ये शिरलेल्या डझनभर विषारी-बिनविषारी सापांना जीवनदान, पाहा व्हिडिओ - Snakes in Thane
  2. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची राज्य सरकार करू शकतं घोषणा; निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णयाची शक्यता - Loan Waiver For Farmers
  3. ...अन्यथा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं मूळ आरक्षण सोडून सर्व रद्द करा - मनोज जरांगे पाटील - Maratha Reservation

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.