ETV Bharat / state

'छत्रपतींच्या आशिर्वादाने झाकीर नाईकच्या अवलादींचे सगळे काळे धंदे बंद करणार', भाजपा नेते मिहीर कोटेजा यांचे वक्तव्य - Mihir Koteja Statement - MIHIR KOTEJA STATEMENT

Mihir Koteja Statement : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भाजपा नेते मिहीर कोटेजा यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे. यात त्यांनी उद्धव ठाकरे गटाला उद्देशून छत्रपतींच्या आशिर्वादाने झाकीर नाईकच्या अवलादींचे सगळे काळे धंदे, ड्रग्स असो की गुटखा की मटका सगळं बंद करणार, असं म्हटलं आहे.

Mihir Koteja Statement
मिहीर कोटेजा (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 11, 2024, 11:02 PM IST

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील निवडणूक स्थितीविषयी माहिती देताना मिहिर कोटेजा (Reporter)

मुंबई Mihir Koteja Statement : पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार आहे. या टप्प्यात मुंबईचा देखील समावेश आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून, आरोप-प्रत्यारोपांमध्ये वाढ झाली आहे. याला निमित्त ठरलंय मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेलं चर्चासत्र. मुंबई मराठी पत्रकार संघाने मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना 'मुंबई शहराच्या विकासाच्या दृष्टीने तुमचे व्हिजन काय?' या विषयावर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. या चर्चासत्राला सर्वच नेते उपस्थित होते; मात्र, ही चर्चा जेव्हा मूळ विकासाच्या मुद्द्यावर आली त्यावेळी संजय दिना पाटील यांनी चर्चासत्रातून काढता पाय घेतला. त्यांना चर्चासत्राला पुन्हा आमंत्रित करण्यासाठी आयोजकांकडून अनेक फोन देखील करण्यात आले. मात्र, ते चर्चासत्राला उपस्थित राहिले नाहीत. यावरून आता ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांना भाजपा उमेदवार विहीर कोटेजा यांनी थेट चर्चेचं आव्हान दिलं आहे.

मानखुर्द शिवाजीनगरचे फक्त शिवाजी नगर करणार : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भाजपा नेते मिहीर कोटेजा यांनी या संदर्भात एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांना माझं चर्चेचं खुलं आव्हान आहे. तुमच्यासोबत मतदारसंघाच्या विकासाची खुली चर्चा करायला मी कधीही तयार आहे. त्या दिवशी तुम्ही चर्चेतून पळ काढला. आयोजकांनी १५-१५ फोन करूनही चर्चेतून पळ काढला. नरेंद्र मोदी मुंबईत प्रचारासाठी येणार या नुसत्या विचारानेच वेड लागल्यासारखे बडबडत आहात."मिहीर कोटेजा यांनी पुढे म्हटलं आहे की, "मी सगळ्यात पहिले सांगू इच्छितो की, ज्या दिवशी मी निवडून येईल तेव्हा मानखुर्द शिवाजीनगरचे नाव फक्त शिवाजी नगर करणार. छत्रपतींच्या आशिर्वादाने झाकीर नाईकच्या अवलादींचे सगळे काळे धंदे, ड्रग्स असो की गुटखा की मटका सगळं बंद करणार. नियोजित कार्यक्रमातून तुम्ही आयोजकांनी पंधरा फोन केले तरी तुम्ही पळ काढला. हे पहिल्यांदाच झालंय असं नाही. तरी तुम्ही सांगाल तिथे यायला मी तयार आहे. मुंबईच्या विकासबद्दल १ टु १ चर्चा करायला मी तयार आहे. माझं चॅलेंज स्वीकारून तुमच्यावरचा पळकुटेपणाचा आरोप पुसण्याची तुम्हाला संधी देत आहे."

मोदींची मुंबईत प्रचारसभा : 20 मे रोजी मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात असून, या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी 17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी मुंबईत येणार आहेत. यावेळी महायुतीकडून त्यांच्या प्रचारसभेचे आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता वीस तारखेला निवडणूक होईपर्यंत हे सर्व नेते एकमेकांना आणखी कोणती आव्हान देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

हेही वाचा :

  1. श्रीकांत शिंदेंच्या प्रचारात फटाक्यामुळं भाजली आज्जी; दोनशे रुपये बेतले जीवावर - Lok Sabha Election 2024
  2. 26/11 हल्ला प्रकरणी उज्ज्वल निकम यांनी सत्य लपवलं; प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप - Prakash Ambedkar On Ujjwal Nikam
  3. "राज ठाकरेंच्या भूमिकेमुळं बाळासाहेबांच्या आत्म्याला...'; संजय राऊतांची टीका - Sanjay Raut

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.