ETV Bharat / state

शरद पवार, नाना पटोले यांना, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा मान्य आहेत का - भाजपाचा सवाल - Sanjay Raut

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 13, 2024, 1:00 PM IST

Sanjay Raut आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आलाय. सर्वच पक्ष जोमानं कामाला लागले असून अनेक ठिकणी सभा घेतल्या जात आहेत. अशातच संजय राऊतांनी मोठं विधान केलय. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलय.

Sanjay Raut
शरद पवार नाना पटोले उद्धव ठाकरे (संपादित छायाचित्र)

मुंबई Sanjay Raut : ऑक्टोबर महिन्यामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापत आहे. महायुती असेल किंवा महाविकास आघाडी दोन्ही बाजूने विधानसभा निवडणुकीची तयारी जोमात सुरू आहे. अशातच महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा नक्कीच कोणाचा असेल यावर अद्याप चर्चा सुरू असताना उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मात्र, हा चेहरा उद्धव ठाकरे यांचाच असेल, असं म्हटलय. त्यावर उद्धव ठाकरे यांचा चेहरा शरद पवार, नाना पटोले यांना मान्य आहे का? असा थेट प्रश्न भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला आहे. ते मुंबईत बोलत होते.

महायुतीचा चेहरा लवकरच : येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राज्यातील राजकीय वातावरण सध्या विविध कारणामुळे ढवळून निघालं आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत भाजपाचा झालेला दारुण पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. अशात आता विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार यावरून दावे सुरू आहेत. महायुतीकडून अद्याप याबाबत घोषणा झाली नसली तरी, महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांचं नाव समोर आलं आहे. उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांना प्रमोट केलं आहे. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार त्याचप्रमाणे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना २४ तासाची मुदत देत मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे हे त्यांना मान्य आहेत का? याचं स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी केली आहे.

शरद पवार तेव्हा गैरहजर : चंद्रशेखर बावनकुळे पुढं म्हणाले की, राज्यात महाराष्ट्राची संस्कृती खराब करण्याचं काम हे महाविकास आघाडीनं केलं आहे. त्यात ज्या प्रकारचे घाणेरडं राजकारण सध्या राज्यात होत आहे त्यास उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत आणि काँग्रेस हे जबाबदार आहेत. तसंच २०१९ पासून महाराष्ट्रात घाणेरड्या राजकारणाला सुरुवात झाली, मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार आता सर्वपक्षीय बैठकीची मागणी करत आहेत. परंतु या संदर्भात जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती त्या बैठकीस शरद पवार, महाविकास आघाडीचे नेते गैरहजर राहिले आणि त्यांनी मोठं राजकारण केलं, असा आरोपही त्यांनी केला आहे.

सुपाऱ्या फेकून काही होत नाही : काँग्रेसला लाडकी बहीण योजनेची भीती वाटते. शिवराज सिंह चौहान आणि एकनाथ शिंदे खोटं बोलणार नाहीत. मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा ८ करोड जनतेला या योजनेचा थेट फायदा होणार आहे. महाराष्ट्रातील जनता माहायुतीवर कधीच नाराज नव्हती. परंतु लोकसभा निवडणुकीत फेक नेरेटिव्ह पसरवून त्याचा फायदा घेतला गेला. आताही विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून समाजात भांडण लावण्याची कामं सुरू आहेत. परंतु सुपाऱ्या फेकून काही होत नाही. असा टोला बावनकुळेंनी ठाकरे गटाला लगावला आहे.

हेही वाचा

  1. दिल्लीत जाऊन गुन्हेगाराला भेटणं मोठा गुन्हा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल - Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
  2. फसव्या योजना घोषित करण्यासाठी एक महिना निवडणूक पुढं ढकलण्याचा प्रयत्न- नाना पटोलेंचा आरोप - Nana Patole On Govenment

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.