ETV Bharat / state

लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेत सुद्धा भाजपाला 'फेक नॅरेटिव्ह'ची चिंता - BJP in tension about fack narrative

BJP in tension about fack narrative - लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. निवडणुकीमध्ये फेक नॅरेटिव्हचा फटका महायुतीला मोठ्या प्रमाणात बसला, असा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पुन्हा असं घडू नये याची चिंता भाजपाला लागली आहे.

BJP in tension about fack narrative
भाजपाला फेक नॅरेटिव्हची चिंता (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 14, 2024, 2:51 PM IST

मुंबई BJP in tension about fack narrative : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या जोरात चर्चेत आहे. परंतु या योजनेवरून महायुतीतील नेते बेताल वक्तव्यं करू लागल्यानं त्याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. कारण मागच्या लोकसभा निवडणुकीत फेक नॅरेटिव्हचा फटका महायुतीला मोठ्या प्रमाणात बसला, असं त्यांचंच मत आहे. आता भाजपाचे वरिष्ठ नेते सतर्क झाले असून त्यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना लगाम लावण्यास सांगितलं आहे.

फेक नॅरेटिव्ह पासून बचाव करण्यासाठी : मागच्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमधील भाजपाचे नेते, खासदार, माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी ४०० खासदार निवडून आले तर संविधान बदलू अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. हेगडे यांच्या याच वक्तव्याचा फटका मागच्या निवडणुकीत देशभरात भाजपाला बसला. भाजपानं कितीही आरडा ओरड करून फेक नॅरेटिव्हचा मुद्दा गाजवण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा त्यात ते यशस्वी झाले नाहीत. हेगडे यांच्या वक्तव्याची किंमत भाजपाला निवडणुकीत मोजावी लागली. आता विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून तशाच पद्धतीची वक्तव्यं महायुतीचे नेते करत असल्यानं फेक नॅरेटिव्हपासून बचाव करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दमछाक करावी लागत आहे.

विरोधकांच्या हाती आयते कोलीत : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना महायुतीचे आमदार रवी राणा यांनी, ज्या लाडक्या बहिणी येत्या विधानसभा निवडणुकीत आशीर्वाद देणार नाहीत, त्यांचे पंधराशे रुपये परत घेईन. या पद्धतीचं वक्तव्य करून महायुतीला अडचणीत आणलं. तर दुसरीकडे शिंदे सेनेचे आमदार महेश शिंदे यांनीसुद्धा निवडणुकीत साथ न देणाऱ्यांचं नाव लाडकी बहीण योजनेतून कट करू, असा इशारा जाहीर कार्यक्रमातून दिला. अगोदरच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधाऱ्यांना टीकेचं धनी व्हावे लागत असताना, विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उघडपणे रवी राणा आणि महेश शिंदे या दोन्ही आमदारांना त्यांच्या वक्तव्यावरून खडसावलं. 'कुणाचा बाप जरी आला तरी बहिणींची योजना बंद करू शकत नाही'. जोपर्यंत हे त्रिमूर्ती सरकार आहे, तोपर्यंत योजना सुरूच राहणार असं फडणवीस म्हणाले आहेत. तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही योजना आणलेली नसून काहीजण विनाकारण नको ती वक्तव्यं करतात आणि त्यातून नाहक महायुतीच्या सरकारची बदनामी होते. म्हणून असे प्रकार होऊ देऊ नका, असं अजित पवार यांनी खडसावलं आहे.

वातावरण बदलण्याची भीती : ज्या पद्धतीनं 'लाडली बहना' या योजनेचा फायदा भाजपाला मध्य प्रदेशमध्ये झाला. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात होईल, अशी आशा महायुतीला आहे. या कारणानं महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही योजना आणली गेली असून त्याची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यासाठी महायुती सरकार कसोटीचे प्रयत्न करत आहे. अशामध्ये रवी राणा आणि महेश शिंदे या आमदारांनी केलेल्या वक्तव्यामुळे निवडणुकीनंतर योजना सुरू राहील की बंद होईल, याबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल. ज्या पद्धतीनं संविधान बदलाच्या चर्चेनं लोकसभा निवडणुकीत वातावरण फिरले तशा पद्धतीचं वातावरण लाडकी बहीण योजनावरून राज्यात होणार तर नाही ना, अशी भीती आता भाजपाला वाटू लागली आहे.

हेही वाचा

  1. मुख्यमंत्री तीर्थ दर्शनचे पोर्टल नसल्यानं ऑनलाईन अर्ज बंद, योजनेकडं ज्येष्ठ नागरिकांची पाठ? - CM Tirth Darshan Yojana
  2. "बहिणींना पैसे दिले, पण दाजींचं काय?", अरविंद सावंत यांची राज्य सरकारवर खोचक टीका - Arvind Sawant News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.