ETV Bharat / state

पुण्यात 'मर्सिडीज'खाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू; घटनेचा सीसीटीव्ही आला समोर - Mercedes Car Accident Pune

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 18, 2024, 9:31 PM IST

Updated : Jun 18, 2024, 10:42 PM IST

Mercedes Car Accident Pune : गेल्या महिन्याभरापासून विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत. अशातच पुण्यातील येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकात आणखी एक अपघात झालाय. यात आलिशान मर्सिडीज गाडीखाली (Mercedes Car) चिरडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास हा अपघात झालाय.

Pune Accident News
गाडीखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू (ETV Bharat Reporter)

पुणे Mercedes Car Accident Pune : पुण्यातील येरवडा भागात महागड्या कारचा भीषण अपघात झालाय. येरवडा येथील गोल्फ कोर्स चौकात आलिशान मर्सिडीज बेंज गाडीखाली (Mercedes Car) चिरडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. मंगळवारी (18 जून) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यानंतर मर्सिडीज बेंजच्या चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. या घटनेचा भयावह असा सीसीटीव्ही समोर आलाय. या अपघातात केदार मोहन चव्हाण (वय ४१) या दुचारीस्वाराचा मृत्यू झालाय. तर मर्सिडीज बेंजचा चालक नंदू अर्जुन ढवळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सीसीटीव्ही : मर्सिडीजखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू (ETV Bharat Reporter)

अशी घडली घटना : याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकातून केदार चव्हाण हे दुचाकीनी जात होते. यावेळी त्या दुचाकीस्वाराला चक्कर आली आणि त्याची गाडी स्लिप झाल्यानं केदार चव्हाण हे रस्त्यावर कोसळले. याचवेळी पाठीमागून येणारी मर्सिडीज बेंज गाडी त्यांच्या अंगावर गेली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या चव्हाण यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारचालकाला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया देताना सहपोलिस आयुक्त विठ्ठल धबडे (ETV Bharat Reporter)

हिट अँड रनच्या घटना वाढल्या : मागील महिन्यातच पुण्यातील कल्याणी नगर भागात पोर्शे या आलिशान कारनं दुचाकीला जोराची धडक दिली होती. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण सध्या हायव्होलटेज आहे. यातील अल्पवयीन आरोपीची आणि त्याच्या कुटुंबीयांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. अशाच प्रकारच्या हिट अँड रनच्या दोन घटना पिंपरी चिंचवड हद्दीतही घडल्या होत्या.

10 ते 15 गाड्यांना उडवलं : या आधीही पुण्यात अशीच एक घटना घडली होती. शहरातील सेनापती बापट रोड, वेताळबाबा चौकात पीएमटी बस चालकानं दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवलं होतं. या बसमध्ये तब्बल 50 प्रवाशी होते. दारूच्या नशेत चालकानं बस मागील दिशेनं चालवत सुमारे 10 ते 15 गाड्यांना उडवलं होतं. या बसचालकाविरोधात शहरातील चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा -

  1. पुणे अपघातामधील आरोपींना वाचविण्याकरिता सरकारकडून दुसऱ्यांदा प्रयत्न सुरू; अनिल देशमुखांनी 'हे' केले आरोप - Pune Porsche Accident
  2. डॉक्टर, पोलिसानंतर आता बालहक्क न्याय मंडळातील सदस्यही चौकशीच्या फेऱ्यात, काय आहे कारण? - Pune car accident case
  3. दुचाकीला ट्रकने धडक दिल्यानं इंजिनीअरिंगच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; ट्रक चालकाला अटक

Last Updated : Jun 18, 2024, 10:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.