ETV Bharat / state

उन्हाळ्यात घामाघूम होताय? 'ही' रसदार फळं खावून म्हणाल 'थंडा थंडा कूल कूल' - Fruits Benefits

Best Summer Season Fruits : राज्यात उन्हाचा कडाका वाढला असून, तापमानाचा पारा 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचलाय. दुसरीकडं उन्हाळा वाढला असल्यानं फळांची मागणी देखील वाढली आहे. त्यामुळं बाजारात फळांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यानं फळे (Fruit News) ही स्वस्त झाली आहेत. मात्र, उन्हाळ्यात कुठली फळे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत याबाबत आहार तज्ञ मीनल शिंपी यांनी 'ईटीव्ही भारत'ला माहिती दिली.

Summer Story
रसदार फळे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 23, 2024, 10:10 PM IST

प्रतिक्रिया देताना आहार तज्ञ मीनल शिंपी

नाशिक Best Summer Season Fruits : राज्यात सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढली आहे. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसापासून सकाळी गारवा आणि दुपारी कडाक्याचं ऊन अशी परिस्थिती निर्माण झाल्यानं अनेकांना आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे. उन्हाळ्यात पाण्याची आणि इतर मिनरलची कमतरता शरीरात भासते. यासाठी पटकन परिणाम करणारे अन्न म्हणजे फळं. यातून शरीराला आवश्यक पाणी आणि मिनरल मिळते. अशात फळ बाजारात देखील फळांची आवक वाढली आहे. रसदार फळांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. यात द्राक्ष, कलिंगड, स्ट्रॉबेरी, आंबा, अननस यासारख्या रसदार फळांना ग्राहकांची मोठी मागणी आहे. ही फळे रोजच्या आहारात वापरल्यास त्याचा शरीराला फायदा होतो, असं आहार तज्ञ सांगतात.

रसदार फळं फायदेशीर : उन्हाळ्यामध्ये घाम जास्त येतो. त्यामुळं शरीरातून मिनरल्स घामावाटे शरीराबाहेर पडतात. अशा वातावरणात आपल्या शरीरात मिनरल्स, विटामिन्स, इलेक्ट्रॉलाइट्स आहाराद्वारे आपल्या शरीराला मिळाले तर त्याचा आरोग्यासाठी फायदा होतो. त्यामुळं उन्हाळ्यामध्ये नैसर्गिकरीत्या तयार होणारे फळं, ज्यात खरबूज, कलिंगड, द्राक्ष, अननस, आंबा, स्ट्रॉबेरी, काकडी यांचा दैनंदिन आहारात वापर करणं गरजेचं आहे. यात कलिंगड आणि खरबूज यात मोठ्या प्रमाणात मिनरल्स असतात. कॅलरीजचं प्रमाण देखील कमी असल्यानं वजन देखील वाढत नाही. यातून सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम शरीराला मिळतात. तसेच दिवसातून दहा ग्लास पाणी पिलं पाहिजं. यासोबत नारळ पाणी, ताक, उसाचा रस याचा देखील सेवन केल्यास शरीराला फायदेशीर असल्याचा आहार तज्ञ मीनल शिंपी सांगतात.

फळांचे भाव काय आहेत -

  1. अननस - 40 ते 60 रुपये प्रति नग
  2. कलिंगड - 30 ते 40 रुपये प्रति नग
  3. आंबा (लालबाग) - 100 रुपये पासून पुढे
  4. स्ट्रॉबेरी - 120 ते 150 रुपये किलो

फळांचे हे आहेत फायदे

  1. अननस - अननस आरोग्यासाठी लाभदायक आहे. अननस ज्यूस पिल्यानं पोटात असणारी जळजळ, उष्णता कमी होण्यास मदत होते.
  2. स्ट्रॉबेरी - स्ट्रॉबेरी हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. स्ट्रॉबेरी खाण्यानं तहान, भूक दोन्ही भागण्यास मदत होते. प्रतिकारशक्ती वाढते.
  3. कलिंगड - उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमतरता भरून काढण्यासाठी कलिंगड फायदेशीर आहे. यात मिनरल्स प्रमाण अधिक असल्यानं त्याचा शरीरासाठी फायदा होतो.
  4. द्राक्ष - द्राक्षाचा रस उन्हाळ्यात उत्तम असतो. त्यामुळं उन्हाळ्यात लघवीला होणारी जळजळ, हाता पायांची आणि डोळ्यांची आग होण्याची समस्या कमी होते.

हेही वाचा -

  1. सिताफळ आरोग्यासाठी उत्तम उपाय! खाण्याने होतील जबरदस्त फायदे
  2. रामफळावरचं रेखाटले श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान, राम मंदिर; येवल्यातील संतोष राऊळ यांची अप्रतिम कला
  3. गुलाबी पेरू आरोग्यासाठी फायदेशीर, हिवाळ्यात तो खाल्ल्याने होतात 'हे' आश्चर्यकारक फायदे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.