मुंबई : कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर येथे बेस्टचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात बेस्ट बसनं रस्त्यावर चालणाऱ्या 10 ते 12 जणांना चिरडलं. त्यात 4 ते 5 जणांचा मृत्यू झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. जखमींना सायन आणि कुर्ला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ब्रेक फेल झाल्यामुळं अपघात : ब्रेक फेल झाल्यामुळं हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवली आहे. बेस्ट बस रूट क्र.332 कुर्ला स्थानक येथून या अंधेरीकडे जात असताना हा अपघात बुद्ध कॉलनी जवळील आंबेडकर नगर येथे झाला.
या अपघातामुळं परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळ गाठत बचावकार्य सुरुवात केलं आहे. जखमींना आणि मृतांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या अपघातामुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा