ETV Bharat / state

Honey Trap Case : बारामतीच्या डॉक्टरवर प्रेमाचं जाळं : खंडणीसाठी अपहरण करुन घेतला 'इतक्या' लाखांचा चेक - Police Busted Honey Trap Racket

Honey Trap In Baramati : बारामती इथल्या डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून लाखो रुपये खंडणी घेताना आरोपींना रंगेहात पकडण्यात आलं. या डॉक्टरला खंडणीखोरांनी मारहाण केल्याचंही उघड झालं आहे.

Honey Trap In Baramati
पकडण्यात आलेले आरोपी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 13, 2024, 12:20 PM IST

पुणे Honey Trap In Baramati : प्रेमाच्या जाळ्यात ओढून खंडणीसाठी अपहरण करणारी टोळी बारामती पोलिसांनी जेरबंद केली आहे. या टोळीतील 2 महिला आणि 2 आरोपींना जेरबंद करण्यात पोलीस पथकाला यश आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांनी दिली आहे. ज्योती कदम, अंकिता भोसले, निलेश बनसोडे, चेतन गायकवाड असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. या आरोपींनी बारामती इथल्या डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून 10 लाखांचा चेक घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लॉजवर येण्याचा आग्रह : बारामती येथील डॉक्टर यांना महिला ज्योती कदम हिनं भेटण्यासाठी बोलवलं. त्याप्रमाणे डॉक्टर हे तिला भेटले असता तिनं डॉक्टरांना तिच्यासोबत लॉजवर येण्याचा आग्रह केला. परंतु डॉक्टरांनी तिच्यासोबत लॉजवर येणार नसल्याचं सांगितल्यानंतर ते बारामती येथील एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी गेले. तिथं देखील ज्योती कदम ही डॉक्टरला लॉजवर तिच्यासोबत येण्यासाठी उद्युक्त करत होती. मात्र डॉक्टरनं लॉजवर जाण्यास नकार दिला.

कुख्यात गुंडानं मारहाण करुन केलं अपहरण : नाष्टा संपल्यानंतर डॉक्टर आणि महिला आरोपी ज्योती कदम असे दोघं सूर्यनगरीत बोलत असताना महिला आरोपीचे साथीदार कुख्यात गुंड सतीश सूर्यवंशी, समीर सय्यद, चेतन गायकवाड, रामहरी चितळकर आणि अंकिता भोसले यांनी ईरटीगा कारमध्ये डॉक्टरांना मारहाण केली. यावेळी त्यांनी खंडणीसाठी अपहरण करुन लोणी देवकर एमआयडीसी इथं घेऊन गेले. तिथं आरोपींनी डॉक्टरांना ज्योती कदम ही त्यांची बहीण असल्याचं सांगून तिच्यासोबत लग्न करण्याची किंवा तिच्या उदरनिर्वासाठी दहा लाख रुपये देण्याची मागणी केली.

पैसे देण्यास नकार दिल्यानं कुख्यात गुंडांकडून मारहाण : डॉक्टरांनी त्यांना माझा ज्योती कदम हिच्यासोबत काही एक संबंध नसून पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांना मीडियामध्ये बातमी देऊन बदनामी करण्याची धमकी दिली. तरीदेखील डॉक्टर त्यांना पैसे देण्यास तयार नसल्यानं त्यांनी त्यांचा साथीदार इंदापूर येथील कुख्यात गुन्हेगार निलेश बनसोडे आणि शुभम भगत यांना बोलावून घेतलं. त्या सर्वांनी डॉक्टरांना मारहाण करुन खंडणी उकळण्यासाठी आळंदी इथं नेवून लग्न करण्याचा बहाणा केला. त्यानंतर सोलापूर पुणे रस्त्यानं निघून पाटस इथं घेवून गेले.

खंडणी उकळण्यासाठी आणखी कुख्यात गुंडांना बोलावलं : तेथे त्यांनी डॉक्टरांकडून खंडणी उकळण्यासाठी बारामती येथील कुख्यात गुन्हेगार झुंजार उर्फ गणेश मागाडे यास बोलवून घेतलं. त्या सर्वांनी तक्रारदार डॉक्टर यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्यानं डॉक्टर त्यांना सहा लाख रुपये देण्यास तयार झाले. त्याप्रमाणं बुधवारी सकाळी अकरा वाजता झुंजार माघाडे हा डॉक्टरांच्या हॉस्पिटल येथे येऊन चेक घेऊन जाणार असं ठरलं. त्यानंतर त्या टोळीनं डॉक्टरांना सोडलं.

पीडित डॉक्टरांनी घेतली पोलीस ठाण्यात धाव : बुधवारी सकाळी यातील पीडित डॉक्टर बारामती पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांनी सदरचा घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. कुख्यात आरोपी खंडणी घेण्यासाठी येत असल्यानं सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळी, पोलीस हवालदार राम कानगुडे, हे वेशांतर करुन पीडित डॉक्टरांच्या रुग्णालयात रुग्ण म्हणून सापळा रचून बसले. यावेळी आरोपी झुंजार माघाडे यानं डॉक्टरांकडून चेक स्वरुपात खंडणी स्वीकारताच त्याला पोलीस पथकानं ताब्यात घेतलं. त्यानंतर यातील डॉक्टरांच्या तक्रारीवरुन संपूर्ण टोळी विरुद्ध खंडणीसाठी अपहरण करण्याचा गुन्हा बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. यातील उर्वरित आरोपींचा शोध घेत असताना बारामती तालुका पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस हवालदार राम कानगुडे यांना मिळालेल्या माहितीवरुन यातील आरोपी ज्योती कदम, अंकिता भोसले, निलेश बनसोडे, चेतन गायकवाड यांना अटक करण्यात आली.

खंडणीखोरांना न्यायालयानं ठोठावली कोठडी : पोलिसांनी या आरोपींकडं केलेल्या तपासात सर्व आरोपींची गुन्हेगारी टोळी असल्याचं उघडं झालं. या आरोपींनी डॉक्टरांना सुनियोजित कट रुचून खंडणीसाठी अपहरण केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. यातील आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, त्यांना 25 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे हे करत आहेत. सदरची कामगिरी बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोरख गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, राजेश माळी, गणेश पाटील, दत्तात्रय लेंडवे पोलीस अंमलदार राम कानगुडे, राजश्री आटोळे, संतोष मखरे, दीपक दराडे यांनी केली आहे.

हेही वाचा :

  1. Mumbai Honeytrap Case : पाकिस्तानी महिलेच्या हनीट्रॅपमध्ये अडकला माझगाव डॉकमधील तरुण, लीक केली संवेदनशील माहिती
  2. Nagpur Crime News: 'त्या' हत्या प्रकरणातील चौथ्या आरोपीला अटक; सेक्सटोर्शन केसमध्ये सक्रिय सहभाग
  3. Nagpur Crime News: सेक्सटॉर्शन रॅकेटमध्ये पतीकडूनच 'हनी ट्रॅप' म्हणून वापर, अनेकांना ब्लॅकमेल करत कोट्यवधी रुपये उकळले!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.