ETV Bharat / state

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांचं हिरेजडित पोर्ट्रेट; किती हजार हिऱ्यांचा समावेश? पाहा व्हिडिओ - Uddhav Thackeray Birthday

Uddhav Thackeray Birthday : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘भावी मुख्यमंत्री’ अशी बॅनरबाजी बघायला मिळत आहे. उद्धव ठाकरे देखील भावी मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडं उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एका शिवसैनिकाकडून अनोखी भेट देण्यात आली आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 26, 2024, 7:44 PM IST

Uddhav Thackeray Birthday News
बाळासाहेबांची हिरेजडित प्रतिमा (ETV BHARAT Reporter)

मुंबई Uddhav Thackeray Birthday : शनिवारी म्हणजे उद्या 27 जुलै रोजी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा वाढदिवस आहे. प्रत्येक वर्षी वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शिवसैनिक, कार्यकर्ते मातोश्री येथे येत, उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत असतात. तर गुरूवारपासूनच मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त "महाराष्ट्राच्या मनातील भावी मुख्यमंत्री... कुटुंबप्रमुख" असे बॅनर झळकले आहेत. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना बाळासाहेबांची प्रतिमा असणारे मोठे पोर्ट्रेट कलाकर शैलेश आचरेकर यांनी भेट दिले आहे.

कलाकर शैलेश आचरेकर यांनी साकारले बाळासाहेबांची प्रतिमा (ETV BHARAT Reporter)

27 हजार हिरेजडित पोर्ट्रेट : शिवसेना (ठाकरे गटाचे) जनसंपर्क प्रमुख आणि प्रवक्ते हर्षल प्रधान यांच्या संकल्पनेतून प्रसिद्ध आर्टिस्ट शैलेश आचरेकर यांनी बाळासाहेबांचे भले मोठे हिरेजडित पोर्ट्रेट साकारले आहे. याची उंची चार फूट आणि रुंदी तीन फूट आहे. या पोर्ट्रेटमध्ये काही अस्सल हिरे आणि मिक्स खड्यांचा वापर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शैलेश आचरेकर यांनी आज मातोश्री येथे जात उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचे हे पोर्ट्रेट दिले. यावेळी आचरेकरांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी खासदार संजय राऊत, विनायक राऊत, शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर, जनसंपर्कप्रमुख हर्षल प्रधान आदी उपस्थित होते.

हिऱ्यामध्ये जसं तेज असतं तसेच तेज बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वात होतं. आज जरी बाळासाहेब आपल्यात हयात नसले तरी त्यांच्या विचारांचे तेज अजूनही आपल्या मनावर कायम आहे. त्यामुळं पोर्ट्रेट कोणाचे असावे? असा प्रश्न माझ्यासमोर आला तेव्हा बाळासाहेबांचे व्यक्तिमत्व माझ्या समोर आले. म्हणून मी बाळासाहेबांचेच हिरेजडीत पोर्ट्रेट साकारले आहे. - शैलेश असरेकर, कलाकार

6 महिन्यानंतर साकारले पोर्ट्रेट : हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हे हिरेजडित पोर्ट्रेट तयार करण्यासाठी मागील सहा महिन्यापासून माझे काम सुरू होते. याच्यामध्ये काही अस्सल हिरे आणि थोडे मिक्स खड्यांचा वापर करण्यात आला आहे. बाळासाहेबांचे हिरेजडित पोर्ट्रेट असावे, ही संकल्पना जनसंपर्कप्रमुख हर्षल प्रधान यांची होती, असं "ईटीव्ही भारत"शी बोलताना आर्टिस्ट शैलेश आचरेकर यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. विधानसभा निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करा; शिवसेनेची उच्च न्यायालयात धाव - MLA Disqualification Case
  2. "जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री", वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांचे लागले बॅनर - Uddhav Thackeray Banner
  3. "...त्याचवेळी फडणवीसांवर एफआयआर का नाही केला?" चंद्रशेखर बावनकुळेंचा अनिल देशमुखांना सवाल - Chandrashekhar Bawankule

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.