ETV Bharat / state

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील चौकशी अहवाल प्राप्त; शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले शाळेत बसवणार पॅनिक बटन - Deepak Kesarkar On Badlapur Report - DEEPAK KESARKAR ON BADLAPUR REPORT

Deepak Kesarkar On Badlapur Report : बदलापूर इथल्या चिमुकल्या मुलींवर नराधमानं अत्याचार केल्याप्रकरणी राज्य सरकारनं चौकशी समिती नेमली होती. या समितीनं आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालावर बुधवारी निर्णय घेणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

Deepak Kesarkar On Badlapur Report
शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2024, 3:49 PM IST

मुंबई Deepak Kesarkar On Badlapur Report : बदलापूरमधील अत्याचार प्रकरणी शासनानं चौकशी अहवाल तयार केला असून, याबाबत बुधवारी अहवालावर निर्णय घेण्यात येणार आहे. तर दुसरीकडं आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी न्यायालयानं सुनावली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी सरकारनं एक समिती नेमली होती. जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं सरकारनं नमूद केलं आहे. याबाबत घटनेच्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाला असून, शासन यावर बुधवारी निर्णय घेणार आहे. सुरक्षेबाबत शाळांमध्ये पॅनिक बटन बसवणार येणार आहे, अशीही माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. आज त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

बदलापूर प्रकरणातील दोषींना सोडणार नाही : मुंबई रिजनचे डिप्युटी डायरेक्टर यांच्या नेतृत्वाखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली या समितीनं चौकशी केली आहे. या समितीचा अहवाल आम्हाला आज प्राप्त होईल. यावर उद्या सुट्टी असल्यामुळं बुधवारी निर्णय घेण्यात येईल. शाळा, परिसर, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी सरकारनं सीसीटीव्ही असणं अनिवार्य म्हटलं आहे. याबाबत निर्णय झाला आहे. तसेच जीआर देखील निघाला आहे. दरम्यान, बदलापूर घटनेच्या चौकशीचा अहवाल तयार झाला आहे. उद्या सुट्टी असल्यानं बुधवारी अहवालावर आम्ही निर्णय घेऊ, असं दीपक केसरकर म्हणाले.

आदिवासी पाड्यातील शाळांबाबत आखणार 'ही' योजना : "आदिवासी पाड्यात शाळा येतात, त्या शाळा शासनाच्या अखत्यारित येत नाहीत. शाळा आणि शाळेच्या प्रशासनावर एकाच डिपार्टमेंटचा पूर्ण कंट्रोल असावा, अशी सिस्टीम आम्ही आणण्याच्या प्रयत्नात आहोत. बदलापूर घटनेत जे जे दोषी असतील त्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होईल. जो अहवाल आलाय त्याच्यात दोषींची नावं आलेली आहेत. ती नावं आम्ही पोलिसांना देणार आणि त्यांच्यावर जी काय कारवाई करायची, ती कारवाई पोलीस करतील. परंतु बदलापूर घटनेतील दोषींना सोडणार नाही," असं शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले.

शाळांत बसवणार पॅनिक बटन : "बदलापूरच्या घटनेनंतर राज्यातील संपूर्ण सिस्टम आपल्याला बदलावी लागेल. अत्यंत महत्त्वाचा निर्णय कालच्या बैठकीमध्ये झाला, तो म्हणजे मी ज्यावेळेला गृहराज्यमंत्री होतो, तेव्हा एक प्रस्ताव सादर केलेला होता. सर्व शाळांमध्ये पॅनिक बटन बसवायचं. विद्यार्थी आणि महिलांना पॅनिक बटन द्यावं. या पॅनिक बटनचं मी प्रेझेंटेशन सुद्धा केलेलं होतं. महिला किंवा विद्यार्थी कधीही अडचणीमध्ये आले की, त्यांनी पॅनिक बटन दाबलं तर ताबडतोब पोलीस स्टेशनला त्याची इन्फॉर्मेशन जाते. त्याला ट्रॅकिंग सिस्टीम आहे. म्हणजे आरोपी कुठे गेला आहे, ते समजते. त्यामुळं अशी सिस्टीम आली तर निश्चितपणे अनुचित, गैरप्रकार होणार नाहीत. मोबाईलमध्येही पॅनिक बटन बसवण्यात येते का, याबाबत देखील विचार सुरु आहे. त्यामुळे शाळांमध्ये पॅनिक बटन बसवण्याचाही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाला आहे. या अद्यावत तंत्रज्ञानामुळे आरोपी सुद्धा चुकीचं काम करणाचं धाडसच करणार नाही, असं मंत्री दीपक केसरकर म्हणाले. तसेच शाळांमध्ये जी तक्रारपेटी आहे ती पोलिसांच्या उपस्थितीमध्येच उघडली जावी, त्याबाबत जीआर काढला आहे. त्याची सुद्धा अंमलबजावणी पुढच्या काळात होईल."

हेही वाचा :

  1. सत्यमेव जयते: ठाकरे घटना मानत नव्हते, म्हणून निवडणूक आयोगानं नाकारलं; दीपक केसरकरांचा हल्लाबोल
  2. Dipak Kesarkar on Farmers Issues : नुकसानग्रस्त भागातील पंचनामे होण्यास विलंब; मंत्री केसरकरांनी सांगितले 'हे' कारण
  3. Dipak Kesarkar : मराठी भाषेला प्राधान्य द्या - शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.