ETV Bharat / state

वामन म्हात्रेंना 'ते' वक्तव्य भोवलं; ॲट्रॉसिटी अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल - Vaman Mhatre - VAMAN MHATRE

Vaman Mhatre News : शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी "तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे, असं कथित वक्तव्य त्यांनी काल एका महिला पत्रकाराबाबत केलं होतं.

Vaman Mhatre
वामन म्हात्रे (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 21, 2024, 7:38 PM IST

Updated : Aug 21, 2024, 9:52 PM IST

ठाणे Vaman Mhatre News : बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी बदलापूर बलात्काराच्या घटनेचं कव्हरेज करणाऱ्या महिला पत्रकारावर आगपाखड केली होती. "तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे", असं कथित वक्तव्य त्यांनी केलं होतं. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुषमा अंधारेंच्या ठिय्या आंदोलनासह जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनाच्या आंदोलनाला यश आलंय.

Badlapur School News (Source- ETV Bharat)

पत्रकारांनी व्यक्त केला संताप : बदलापुरात मंगळवारी संतप्त नागरिकांनी आंदोलन करत रेल्वे रोको आंदोलन केलं होतं. हे आंदोलन पाहून शिवसेनेचे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांची महिला पत्रकाराशी बोलताना जीभ घसरली होती. "तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे", अशा शब्दात म्हात्रे यांनी महिला पत्रकाराविरोधात कथित वक्तव्य केलं होते. त्यामुळं म्हात्रे यांचा सर्वत्र निषेध झाला. एका महिला पत्रकाराचा असा अपमान होत असेल तर, पत्रकारांनी दाद कुणाकडं मागावी, अशा भावना पत्रकारांनी सोशल माध्यमांवर मांडल्या होत्या.

तिथं त्याचं थोबाड फोडेन : याबाबत आज भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ तसंच शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे घडलेल्या प्रकारची माहिती घेण्यासाठी बदलापुरात आल्या होत्या. "मला जर कोणी बोललं, तर मी तिथल्या तिथं त्याचं थोबाड फोडेन," अशा शब्दात चित्रा वाघ यांनी वामन म्हात्रेंचा समाचार घेतला. तर सुषमा अंधारे यांनी तर जोपर्यत वामन म्हात्रेंवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरुच राहणार असल्याची भूमिका घेतली होती.

काय म्हणाल्या चित्रा वाघ : "मला हा मुद्दा आता समजला. गुन्हा का नोंद होत नाही, याविषयी मी पोलिसांशी बोलते. पण मला असं वाटतं, की कोणीही असूदे, ज्यावेळी असं आपल्याला कुणी बोललले तर तुम्ही का नाही त्याचं थोबाड फोडलं? तिथल्या तिथं थोबाड फोडायला पाहिजं होतं. मी काम करत असताना मला कोणी बोलणार असेल, तर तो कोण आहे, हे मी बघणार नाही. याबाबत पोलिसांनी गुन्हा नोंद करायलाच पाहिजे. पण एक महिला म्हणून सगळ्या ठिकाणी पोलीस-पोलीस करुन कसं जमेल. मी सक्षम आहे. मी पत्रकार आहे. मी राजकीय कार्यकर्ती आहे. मला जर कोणी बोललं तर मी तिथल्या तिथं त्याचं थोबाड फोडेन. मग पोलिसांना सांगेन आता करायचं ते करा," असं चित्रा वाघ यांनी गुन्हा दाखल होण्यापूर्वी प्रतिक्रिया दिली होती.

हा मस्तवालपणा कुठून येतो : "आम्हाला तुम्ही पॉलिटिकल मोटिव्हेटेड म्हणता. वार्तांकन करणारी महिला पत्रकार प्रश्न विचारतेय. भाजपाचा पदाधिकारी वामन म्हात्रे एका महिला पत्रकाराला अवार्च्य भाषेत बोलतोय. तुझ्यावर बलात्कार झाल्यासारखं का बोलतेस? हा मस्तवालपणा कुठून येतो. आंदोलन तुम्ही चिघळवलंत. तुम्हाला जर कायदा सुव्यवस्था जपायची असेल तर वामन म्हात्रेला अजून अटक का केली नाही?”, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

अत्याचाराची तक्रार करायला गेलेल्या पालकांना पोलीस ठाण्यात ताटकळत ठेवलं गेलं. पीडितेची आई गरोदर असतानाही त्यांना 10 तासांहून अधिक काळ थांबवून ठेवलं. वैद्यकीय अहवाल आलेला असतानाही गुन्हा दाखल केला नाही. अशा विविध कारणांमुळं विरोधकांनी याप्रकरणी राळ उठवली. तसंच सुषमा अंधारे यांनी आज बदलापुरात आंदोलन केलं. परंतु, त्यांना अडवण्यात आलं होतं.

'हे' वाचलंत का :

  1. "बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांची भूमिका...", बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांचं स्पष्ट मत - Badlapur School Case
  2. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ, गुन्हेगारांवर कायद्याचा वचक नाही? - minor girl abuse cases

Last Updated : Aug 21, 2024, 9:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.