ETV Bharat / state

तामिळनाडूच्या महिलेला साखळदंडानं बांधलं जंगलात ; पीडितेनं रुग्णालयात चिठ्ठी लिहून केला 'हा' धक्कादायक उलगडा - US Woman Found Chained

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 30, 2024, 12:11 PM IST

Updated : Jul 30, 2024, 12:29 PM IST

US Woman Found Chained In Maharashtra : तामिळनाडूच्या महिलेला सिंधुदुर्गच्या जंगलात साखळदंडानं बांधून ठेवल्यानं मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी महिलेनं रुग्णालयात चिठ्ठी लिहून मोठा धक्कादायक उलगडा केला आहे. आपल्या पूर्वीच्या पतीनं आपल्याला 450 किमी अंतरावरुन इथं जंगलात आणून बांधल्याची माहिती या महिलेनं दिली आहे.

US Woman Found Chained In Maharashtra
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

मुंबई US Woman Found Chained In Maharashtra : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात एका झाडाला लोखंडी साखळदंडानं बांधलेल्या अवस्थेत एक महिला आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली. जंगलात महिला बांधलेल्या अवस्थेत असल्यानं पोलिसांनी तत्काळ या महिलेची सुटका करुन तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी या महिलेच्या पूर्वीच्या पतीविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी मंगळवारी वृत्तसंस्थेला दिली आहे. या महिलेनं रुग्णालयात उपचार सुरू असताना एक चिठ्ठी लिहून दिली. या चिठ्ठीच्या आधारानं पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पूर्वीच्या पतीनं महिलेला जंगलात बांधून काढला पळ : सिंधुदुर्गच्या जंगलात या महिलेला तिच्या पूर्वीच्या पतीनं साखळदंडानं बांधून पळ काढला. याबाबतची माहिती पीडित महिलेनं रुग्णालयात एक चिठ्ठी लिहून दिली. यावर महिलेनं दावा की, तिच्या पूर्वीच्या पतीनं तिला 450 किमी दूर जंगलात आणत सिंधुदुर्गच्या समुद्र किनाऱ्यावरील सोनुर्ली गावातील जंगलात साखळदंडानं बांधून ठेवलं. महिलेला बांधून ठेवल्यानंतर या नराधमानं तिथून पळ काढला.

मेंढपाळाला रडण्याचा आवाज आल्यानं घटनेला फुटली वाचा : सिंधुदुर्गमधील जंगलात शनिवारी संध्याकाळी एका मेंढपाळाला महिलेच्या रडण्याचा आवाज आला. त्यामुळे या मेंढपाळानं शोध घेतला असता, ही महिला आढळून आली. मात्र या महिलेला पाहताच या मेंढपाळाचा थरकाप उडाला. या महिलेला साखळदंडानं बांधण्यात आलं होतं. त्यामुळे या मेंढपाळानं तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थलावर धाव घेत महिलेची सुटका केली. या महिलेजवळ तिचं तामिळनाडूचा पत्ता असलेलं आधार कार्ड आणि तिच्या अमेरिकेच्या पासपोर्टची प्रत मिळाली. मात्र या महिलेच्या व्हिसाची मुदत संपली असून ती मागील 10 वर्षांपासून भारतात राहत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. "या महिलेला उपचारासाठी गोव्यातील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी या महिलेला मानसिक त्रास असून तिच्याकडून प्रिस्क्रिप्शनही मिळालं," अशी माहिती दिली.

पूर्वीच्या पतीविरोधात दाखल केला गुन्हा : पीडित महिलेनं रुग्णालयात लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी तिच्या पूर्वीच्या पतीविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यासह महिलेला बंदिस्त केल्याप्रकरणीही त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत बंदिस्त ठेवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे," अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ अग्रवाल यांनी दिली. महिलेचा अद्यापही अधिकृतपणे जबाब नोंदवला गेला नाही. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस पथकांनं तपास सुरू केला आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. "तिच्या पूर्वीच्या पतीनं तिला बेड्या ठोकल्याचा महिलेचा दावा खरा आहे, की नाही हे देखील पोलीस पडताळण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही महिलेनं लिहिलेल्या चिठ्ठीतील प्रत्येक दाव्याची पडताळणी करत आहोत." अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. साखळदंडात सापडलेल्या विदेशी महिलेच्या प्रकृतीत सुधारणा, तिला जंगलात कोणी आणून ठेवलं? - USA woman in Sindhudurg forest

Last Updated : Jul 30, 2024, 12:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.