ETV Bharat / state

जुनं ते सोनं म्हणत 'प्री वेडींग'साठी आता जुन्या आठवणींचीं क्रेझ; भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न - Pre Wedding Photo Shoots - PRE WEDDING PHOTO SHOOTS

Pre Wedding Photo Shoots : सध्या प्री वेंडींगच क्रेझ असून यातून लोक आता सायकली, शनिवारवाडा, मंडई असे पूर्वी प्रसिद्ध असलेले ठिकाण पसंत करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नव्या पिढीकडून संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Pre Wedding Photo Shoots
प्री वेडींगसाठी आता जुन्या आठवणींच क्रेझ (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 25, 2024, 11:00 PM IST

Updated : May 26, 2024, 3:28 PM IST

पुणे Pre Wedding Photo Shoots : पुणे शहराला विद्येचे माहेरघर म्हटलं जात तसेच याच पुणे शहराला सायकलींच शहर देखील म्हटल जातं. पुण्यात पूर्वी जिथं तिथं सायकलीच चालवले जात होते. आता ही जरी परिस्थिती बदली असली आणि वाहतूक कोंडीच शहर म्हणून पुण्याला म्हटलं जात असलं तरी पूर्वीचे दिवस आता पुन्हा येऊ लागले असल्याचं चिन्ह पुण्यात दिसू लागलं आहे.

प्री वेंडींग फोटोशूटसाठी आलेले जोडपे आपला अनुभव सांगताना (Reporter)

जुन्या काळातील वस्तुंच क्रेझ वाढलं : सध्या गेल्या काही वर्षांत प्री वेडिंगचा क्रेझ आला असून लग्नाच्या आधी देश विदेशातील विविध ठिकाणी जाऊन प्री वेडिंग शूट केलं जातं आणि मोठा खर्च या माध्यमातून केला जातो. गेल्या काही वर्षांत तर विदेशात जाऊन शूट करण्याचा क्रेझ हा मोठ्या प्रमाणात बघायला मिळत होता. पण आता हा क्रेझ कमी झाला असून नवरा-नवरी तसेच प्री वेडिंग शूट करणारे लोक हे जुन्या काळात गेले असून जुन्या काळातील वास्तू, तसं पेहेराव अश्या गोष्टींचं क्रेझ वाढलेलं पाहायला मिळत आहे. पुण्यात तर शनिवार वाडा, महात्मा फुले मंडई या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सध्या प्री वेडिंग शूट केलं जातं आहे. लोक जुन्या पेहेराव, सायकली, अशा गोष्टींना पसंती देत आहे.

प्री वेडिंगचा ट्रेंड बदलला : याबाबत प्रि वेडिंग शुट करणारा शुभम शिंदे म्हणाला की, मी गेल्या 6 वर्षांपासून या क्षेत्रात असून काही काळानंतर प्री वेडिंगमध्ये ट्रेंड हा बदलत असतो. आता लोक आपल्या जुन्या आठवणी तसेच आपल्या इथलीच शनिवार वाडा, महात्मा फुले मंडई अशा ठिकाणांना पसंती देत आहे. प्री वेडिंग शूट आल्यानं आमच्यासाठी चांगले दिवस आले आहे. अनेक लोक आता याकडे वळले आहे. सध्या उन्हाचा चटका देखील असल्याने आम्ही सकाळच्या सुमारास आणि दुपारच्या सुमारास शुट करत आहे. एकूणच हे ट्रेण्ड सध्या वाढत असल्याने जे पूर्वी फक्त फोटोवर अवलंबून राहावं लागतं असल्याचं ते आता न राहता प्री वेडिंग शूटमध्ये चांगले पैसे मिळत असल्याचं यावेळी त्याने सांगितलं.

नव्या पिढीकडून संस्कृती जपण्याचा प्रयत्न : याबाबत प्री वेडिंग करणारे नवरा-नवरी म्हणाले की, आपणच आपली संस्कृती ही जपली पाहिजे. आम्ही हेच करण्याचं प्रयत्न केलं आहे. पूर्वी पुण्यात सायकलीवर या जा होत होती. तेच सायकल तसेच पेशवे काळातील कपडे घालून आम्ही आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग अ‍ॅक्शन मोडवर; शहरातील 49 पब आणि बारवर कारवाई - Action Against Pubs And Bar In Pune
  2. गुजरातच्या राजकोट शहरात गेम झोनमध्ये 'अग्नितांडव'; 25 जणांचा होरपळून मृत्यू - Fire in Game Zone Gujarat
  3. पेनाला सोन्याचा भाव; इटलीत तयार झालेला पेन थेट कोल्हापुरात, किंमत जाणून डोळे होतील पांढरे - Pen Festival in Kolhapur

Last Updated : May 26, 2024, 3:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.