ETV Bharat / state

मराठी माणसाला नोकरी नाकारणाऱ्या 'आर्या गोल्ड'च्या मालकाने मागितली 'महाराष्ट्राची' माफी - Arya Gold Company

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 26, 2024, 4:08 PM IST

Arya Gold Company : मराठी माणसाला नोकरीत 'नो एन्ट्री' म्हणणाऱ्या 'आर्या गोल्ड' कंपनीच्या (Arya Gold) मालकाला मनसेने चांगलाच धडा शिकवला आहे. त्याचबरोबर कंपनीच्या मालकाने महाराष्ट्राच्या जनतेची आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची माफी मागितली आहे.

Arya Gold Company News
आर्या गोल्ड कंपनीचा माफीनामा (ETV Bharat Reporter)

मुंबई Arya Gold Company : महाराष्ट्रात महाराष्ट्रीयन माणसाला नोकरीत 'नो एन्ट्री' म्हणणाऱ्या मुंबईतील आर्या गोल्ड (Arya Gold) कंपनीच्या मालकाने महाराष्ट्राची आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची माफी मागत वेबसाईटवरील जाहिरात हटवली आहे.

आर्या गोल्ड कंपनीच्या मालकाने मागितली माफी (ETV Bharat Reporter)

नॉन महाराष्ट्रीयन : नोकरी विषयक माहिती देणाऱ्या एका वेबसाईटवर जॉब संदर्भात एक पोस्ट करण्यात आली होती. मुंबईतील मरोळ भागातील 'आर्या गोल्ड' नावाच्या संस्थेत डायमंड कारखान्यात प्रोडक्शन मॅनेजरची नोकरी असल्याची जाहिरात पोस्ट करण्यात आली होती. पोस्टमध्ये नोकरी करणाऱ्या उमेदवाराची पात्रता काय असेल हे देखील नमूद करण्यात आलं होतं. ज्यात 25000 रुपये ते 62760 रुपये पर्यंत वेतन दिलं जाणार असं नमूद होतं. मात्र, उमेदवार हा 'नॉन महाराष्ट्रीयन' असावा अशी अट घालण्यात आली होती. तसेच उमेदवाराला पाच वर्षाचा अनुभव असावा. दिवसाच्या शिफ्टमध्ये काम करावं लागेल अशा प्रकारची माहिती नमूद करण्यात आली होती. मात्र, मुंबईतील मराठी माणसाला डावलून नॉन महाराष्ट्रीयन शब्दामुळं मुंबईतील राजकारण तापलं होत. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक होत 'आर्या गोल्ड' कंपनीसमोर जाऊन आपला रोष व्यक्त केला.

माफीनामा पत्रात काय?: "सन्माननीय राज ठाकरे आणि संपूर्ण महाराष्ट्र मी बंटी रूपरेजा आर्या गोल्ड कंपनीचा मालक आपली जाहीर माफी मागतो. जॉबसाठी मॅनेजर पदासाठी ऑनलाइन जाहिरात दिली होती. शिकावू व्यक्तीकडून जाहिरातमध्ये नकळत काम करताना नॉन महाराष्ट्रीयन हा शब्द गेला होता. त्यात सुधारणा केली असून सदरची जाहिरात आम्ही हटवली आहे. महाराष्ट्रातील जनतेचा भावना दुखवायचा उद्देश नाही. झालेल्या चुकीबद्दल मी कंपनीच्या मालक या नात्याने सर्व महाराष्ट्राची माफी मागतो".

माफीनामा मागत जाहिरात हटवली : आर्या गोल्ड कंपनीच्या जाहीरतीमुळं मुंबईतील मराठी माणूस दुखावला गेला आणि अनेक राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या. मनसेने आक्रमक पवित्रा घेत 'आर्या गोल्ड' कंपनी गाठली. 'आर्या गोल्ड' कंपनीचे मालक बंटी रूपरेजा यांनी महाराष्ट्राची आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची माफी मागितली आहे. तसेच त्यांनी माफी नामा देखील लिहून दिला आहे. सदरची जाहिरात वेबसाईटवरून देखील हटवण्यात आली असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

हेही वाचा -

मुंबईत मराठी माणसाची गळचेपी; अखेर अंधेरीच्या 'आर्य गोल्ड' कंपनीची अक्कल ठिकाणावर, जाहिरातीमधील 'अमराठी' उल्लेख काढला - Arya Gold Company

एक देश, एक सोन्याचा दर लागू करणारे काय आहे धोरण? जाणून घ्या, सोने खरेदीबाबत सर्वकाही - One Nation One Gold Rate Policy

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.