ETV Bharat / state

उद्धव ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरे यांच्या बैठकीत राडा, दोन गटात हमरीतुमरी - LOK SABHA ELECTION 2024

LOK SABHA ELECTION 2024 : शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काल मंगळवार (दि. 3 एप्रिल) रोजी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यावेळी कार्यकर्त्यांमधील मोठी गटबाजी आणि अंतर्गत वाद समोर आला. वाकचौरे यांच्यासमोरच मोठा वाद कार्यकर्त्यांमध्ये झाला.

उबाठा गटाच्या भाऊसाहेब वाकचौरे यांच्या बैठकीत राडा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 4:58 PM IST

उबाठा गटाच्या भाऊसाहेब वाकचौरे यांच्या बैठकीत राडा

अहमदनगर/शिर्डी : LOK SABHA ELECTION 2024 : माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी फाट्यावर एका हॉटेलात कार्यकर्त्यांची काल बैठक आयोजित केली होती. या बैठकीत लोकसभा समन्वयक आणि संपर्क प्रमुखांसमोर तालुक्यातील शिवसेना (उबाठा) गटात नाराजी असल्याचं समोर आलं. (former MP Bhausaheb Vakchoure) माजी खासदार वाकचौरे यांच्या समोरच दोन गटात तुफान शिवीगाळ आणि हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला असल्याने अंतर्गत कलह दिसून आला. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत वाकचौरे यांना त्यांच्याच कार्यकर्त्यांचा डोक्याला ताप होणार असल्याचं बोललं जात आहे.

नाराजी दूर करण्यात वाकचौरे यांना अपयश : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून, शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी संगमनेर तालुक्यातील कार्यकर्ते एकत्र करत आगामी निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी शहराजवळील रायतेवाडी फाट्यावर एका हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन केलं होतं. तसं ते दुपारी एकत्र आले. (Bhausaheb Vakchoure) तालुक्यातून विविध गावातून शिवसैनिक पदाधिकारी याठिकाणी आले होते. अगोदरच वाकचौरे यांच्या पक्ष बदण्याच्या भूमिकेमुळे नाराज असलेल्या शिवसैनिकांची पूर्णपणे नाराजी दूर करण्यात वाकचौरे यांना अपयश आलं आहे.

गटबाजी आणि नाराजी या बैठकीत समोर : बैठकीत दोन गट एकमेकांसमोर उभे राहिले. लोकसभा समन्वयक आणि संपर्कप्रमुखांसमोर वाकचौरे यांच्या उपस्थितीत काही कार्यकर्त्यांनी आर्थिक जुने वाद उकरून काढून एकमेकांची उणीदुनी काढली. शिवीगाळ, अंगावर धावून शिवसेना स्टाईलने वादाला सुरुवात झाली. वाद विकोपाला जाऊ नये, म्हणून वाकचौरे यांनी समजावण्याचा अनेकवेळा प्रयत्न करत त्यांना खडे बोलही सुनावले. यातून उद्धव ठाकरे गटात असलेली गटबाजी आणि नाराजी या बैठकीतून उफाळून बाहेर आल्याने आगामी काळात शिवसेना (उबाठा) भाऊसाहेब वाकचौरे यांना आपलेच कार्यकर्ते डोकेदुखी ठरणार की, नाराजी दूर करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

1 उबाठा गटाकडून लोकसभेच्या चार जागा जाहीर; उन्मेश पाटलांनी हाती बांधलं 'शिवबंधन' - Lok Sabha Election 2024

2 शिवसेना सोडून राष्ट्रवादीत का केला प्रवेश? शिवाजी आढळराव पाटील यांनी उघड केलं गुपित - Shivajirao Adhalrao Patil

3 वंचित बहुजन आघाडीचा सुप्रिया सुळे यांना पाठिंबा, प्रकाश आंबेडकर यांची भूमिका दुटप्पी? काय म्हणाले राजकीय विश्लेषक? - Vanchit Aaghadi

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.