ETV Bharat / state

सुरेंद्र अग्रवाल यांचं अजून एक अंडरवर्ल्ड संबंध पुढे, तुला तर मारून टाकेल, अजून एकाला दिली होती धमकी - Surendra Agarwal - SURENDRA AGARWAL

Surendra Agarwal : पुण्यातील कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणातील त्या अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आहे आहे. आता अजून एकाला अशाच पद्धतीने सुरेंद्र अग्रवाल यांनी धमकी दिल्याचं समोर आलं आहे.

Surendra Agarwal
सुरेंद्र अग्रवाल प्रकरण (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 9:36 PM IST

पुणे Surendra Agarwal : पुण्यातील कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणातील त्या अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर मुश्ताक शब्बीर मोमीन या व्यक्तीने त्याला धमकावल्याचा आरोप केला आहे. 2021 पासून अर्जदार मुश्ताक शब्बीर मोमीन हे पुणे पोलिसांना तसेच सीबीआय यांना अर्ज देत असून आता पुन्हा त्यांनी पुणे पोलिसांना याबाबत अर्ज केला आहे.

मुश्ताक शब्बीर मोमीन आपली कैफियत मांडताना (REporter)

अजय भोसलेसह या व्यक्तीलाही धमकी : ब्रह्मा बिल्डर्सचे मालक आणि अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती उघड झाली होती. भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात सुरेंद्र अग्रवाल यांनी छोटा राजनची मदत घेतली होती. या प्रकरणी अजय भोसले यांच्या हत्येच्या प्रयत्नामध्ये सुरेंद्र अग्रवाल यांच्या विरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण 2009 मध्ये झालं होत. त्यानंतर याच सुरेंद्र अग्रवाल यांनी 2021 मध्ये एका व्यवहाराबाबत मुश्ताक मोमीन यांची आर्थिक फसवणूक करीत त्याला ऑफिसमध्ये बोलवून तुला मारून टाकेल अशी धमकी दिल्याचं समोर आलं आहे.

मोमीनला दिली 'ही' धमकी : याबाबत अर्जदार मुश्ताक मोमीन म्हणाले की सुरेंद्र अग्रवाल, विशाल अग्रवाल आणि जसप्रीत सिंग राजपाल यांना कोंढवा येथील एका जागेचा वादविवाद मिटवून ताबा मिळवून दिला होता. यासाठी आमच्यात आर्थिक व्यवहार देखील झाले होते. 1 ऑगस्ट 2021 मला अग्रवाल यांनी त्यांच्या कार्यालयात बोलावलं आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. म्हणाले "तुझी लायकी नाही, तु काय काम केलस? मी तुला दिड कोटी रुपये देणार नाही. तुला जायचे तिथे जा, तु माझं काहीही वाकड करू शकत नाही. माझी ओळख खूप वरपर्यंत आहे. अंडरवर्ल्डशी माझे डायरेक्ट संबंध आहेत. पोलीस मी खिशात घेवून फिरतो. तुझा अजय भोसले करीन. त्याला जसा ठोकला तसा तुलाही ठोकीन. तो वाचला पण तु वाचणार नाहीस. तुला खल्लास करून टाकीन. तुला आणि तुझ्या परिवाराला जगण्याची इच्छा असेल तर मी जेवढे दिले तेवढ्यात समाधान मान. नाहीतर तुला आणी तुझ्या परिवाराला जिवानीशी हात धुवावा लागेल. माझ्या नादाला लागू नको. तुला खंडणीच्या प्रकरणात अडकून टाकेल आणि जेलची हवा खायला लावेल," अशी धमकी दिली असल्याचं यावेळी मोमीन यांनी सांगितलं.

आयुक्तांसह राज्यपालांनाही निवेदन : ते पुढे म्हणाले की याबाबत 2021 पासून मी पोलीस स्टेशन, पुणे पोलीस आयुक्त तसेच सीबीआय, राज्यपाल यांना पत्र देत आहे. तरीही मला अजूनही न्याय मिळालेला नाही. आता हे अपघाताचं प्रकरण समोर आल्यावर आज पुन्हा मी पुणे पोलिसांकडे अर्ज केला असून मला न्याय मिळावा अशी आशा यावेळी मोमीन यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

  1. 'नातवाचे प्रताप' आजोबांनाही भोवणार, सुरेंद्र अग्रवाल यांचीही चौकशी, सुपारी दिल्याचा आहे आरोप - Pune Porsche Accident Case
  2. डोंबिवली घटनेवरुन अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'सरकार कारवाई नाही उलट धंदा..." - Dombivli fire Incident
  3. ठाकरे गटाचा EVM च्या सुरक्षेवर भरोसा नाय का? ठाण्यात स्ट्रॉंग रुमबाहेर कार्यकर्त्यांचा 'खडा पहारा' - lok sabha election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.