ETV Bharat / state

आंध्रप्रदेशचे राज्‍यपाल एस.अब्‍दुल नजीर सहकुटुंब साईचरणी नतमस्तक; म्हणाले... - Andhra Pradesh Governor In Shirdi - ANDHRA PRADESH GOVERNOR IN SHIRDI

S Abdul Nazeer In Shirdi : आंध्रप्रदेशचे राज्‍यपाल एस. अब्‍दुल नजीर हे साई बाबांचं दर्शन घेण्यासाठी गुरुवारी (25 जुलै) शिर्डीत आले होते. यावेळी त्यांनी सहकुटुंब साई बाबांचं दर्शन घेतलं.

Andhra Pradesh Governor S Abdul Nazeer Visit To Shirdi Sai Baba Temple
आंध्रप्रदेशचे राज्‍यपाल एस.अब्‍दुल नजीर सहकुटुंब साईचरणी नतमस्तक (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 26, 2024, 1:49 PM IST

आंध्रप्रदेशचे राज्‍यपाल एस.अब्‍दुल नजीर सहकुटुंब साईचरणी नतमस्तक (ETV Bharat Reporter)

शिर्डी Andhra Governor Visit To Shirdi : आंध्रप्रदेशचे राज्‍यपाल एस. अब्‍दुल नजीर यांनी सहकुटुंब शिर्डीत येवून साई बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी राज्यपाल एस. अब्‍दुल नजीर यांनी साई बाबांच्या धूप आरतीलाही हजेरी लावली. साई बाबांचं दर्शन घेतल्यानंतर मनाला शांती मिळते, असं मत यावेळी राज्यपाल एस अब्दुल नजीर यांनी व्यक्त केलं.

वस्तु संग्रहालयालाही दिली भेट : एस. अब्‍दुल नजीर गेल्या दोन दिवसांपासून सहकुटुंब शिर्डी दौऱ्यावर होते. 25 जुलैला त्यांनी साईबाबांच्या सायंकाळच्या धूप आरतीला हजेरी लावली. आरतीनंतर त्यांनी साई बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी साई मंदिर परिसरातील साई बाबांच्या वस्तु संग्रहालयालाही त्यांनी भेट दिली. तसंच साई बाबांनी आपल्या हयातीत वापरलेल्या सर्व वस्तूंची माहिती यावेळी संस्थानच्या अधिकाऱ्यांकडून राज्यपालांनी घेतली.

दर्शन घेऊन मनाला समाधान मिळालं : साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याशी बोलताना राज्यपाल म्हणाले की, "साई बाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन मनाला समाधान मिळालं. साई बाबांच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक शिर्डीला येतात. इतकी गर्दी असताना देखील मंदिर परिसर अतिशय स्वच्छ ठेवला जातो," असं म्हणत राज्यपालांनी साईबाबा संस्थानचं कौतुकही केलं. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शाल, साईबाबांची मूर्ती आणि श्री साई सतचरित्र देऊन राज्यपाल एस अब्दुल नजीर यांचा त्यांच्या कुटुंबासह सत्कार केला. यावेळी साई संस्थानचे उप कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आणि साईबाबा संस्थानचे जनसंपर्क प्रमुख तुषार शेळके, साई मंदिर प्रमुख विष्णू थोरात, साई संस्थान सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी आदी उपस्थिती होते.

हेही वाचा -

  1. धनंजय मुंडे साई चरणी लीन; 'या' विषयावर दिली प्रतिक्रिया - Dhananjay Munde
  2. कन्याकुमारी ते दिल्ली कारगिल विजय कलश यात्रेचं शिर्डीत आगमन; साई मंदिरात विजयी कलशाचं पूजन - Kargil Vijay Kalash Yatra
  3. साई बाबांच्या शिर्डीत गुरुपौर्णिमा सोहळा ; तीन दिवसात साईचरणी तब्बल 6 कोटी 25 लाखांची देणगी - Sai Baba Temple Shirdi

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.