ETV Bharat / state

गाईंना वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बस उलटली, दोघांचा जागीच मृत्यू - Shivshahi Bus Accident - SHIVSHAHI BUS ACCIDENT

Shivshahi Bus Accident : अमरावती-नागपूर राष्‍ट्रीय महामार्गावर नांदगावपेठ जवळ शिवशाही बसचा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा मृत्‍यू झाला, तर 15 जण जखमी झाले.

Shivshahi Bus Accident
अमरावती-नागपूर अपघात महामार्गावर (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 25, 2024, 4:04 PM IST

अमरावती Shivshahi Bus Accident : अमरावती-नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. अमरावतीच्या नांदगाव पेठ टोल नाक्याजवळ ही अपघाताची घटना घडलीय. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्‍यू झाला आहे. तर 15 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी 9 च्या सुमारास हा अपघात झाला. गाईंना वाचवण्‍याच्‍या प्रयत्‍नात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्‍यानं हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गाईंना वाचवण्याच्या प्रयत्नात बस पलटी : आज सकाळी नागपूरवरुन अकोल्याच्या दिशेनं ही बस निघाली होती. या बसमध्ये एकूण 28 प्रवासी प्रवास करत होते. यावेळी अमरावती-नागपूर महामार्गावर गाई रस्त्यावर आल्या. यावेळी बस चालकानं गाईंना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या भीषण अपघातात बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

दोघांचा मृत्यू, 15 प्रवासी गंभीर जखमी : या भीषण अपघातात 15 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना नांदगाव पेठ पोलिसांनी नागरिकांच्या मदतीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. जखमींमध्ये बसचालक आणि वाहकाचाही समावेश आहे. आपात्कालीन दरवाजातून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्‍यात आलं. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला.

महामार्गावर वाहतूक विस्कळीत : या अपघातामुळे अमरावती-नागपूर महामार्गावर नांदगाव पेठपासून टोलनाक्यापर्यंत वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. दरम्यान "अपघातस्थळी चार जेसीबी बोलवण्यात आले असून जेसीबीच्या सहाय्यानं पलटी झालेली बस उचलण्यात आली. यावेळी महामार्गावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. या घटनेबाबत अधिक माहिती तपासली जात आहे," असं अमरावतीचे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

हेही वाचा

  1. आज 'ब्लॉकवार'; मध्य रेल्वेचा मेगा तर पश्चिम रेल्वेचा जम्बोब्लॉक; संपूर्ण वेळापत्रक वाचा फक्त एका क्लिकवर - Mumbai Local Train Mega Block
  2. मुंबईहून हैदराबादकडे जाणारं हेलिकॉप्टर पुण्याजवळ कोसळलं, थरार प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांच्या फोनमध्ये कैद - helicopter crashes in Pune
  3. भाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या ताफ्यातील कारने दुचाकीला उडवलं, दोघांचा जागीच मृत्यू - car accident killed 2

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.