ETV Bharat / state

गर्दी न जमल्यानं झाला वाद; माजी आमदार आणि जिल्हाप्रमुखांमध्ये हाणामारी - Amravati Lok Sabha Constituency - AMRAVATI LOK SABHA CONSTITUENCY

Amravati Lok Sabha Election 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित बैठकीत उमेदवाराच्या प्रचाराऐवजी शिवसेनेचे माजी आमदार आणि जिल्हाप्रमुख यांच्यातच हाणामारी झाली. गुरुवारी (दि. 12 एप्रिल) रात्री बडनेरा येथे घडलेल्या या प्रकाराची सध्या मतदार संघात चांगलीच चर्चा सुरू आहे.

शिवसेनेचे माजी आमदार आणि जिल्हाप्रमुखांमध्ये वाद

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 12, 2024, 4:07 PM IST

Updated : Apr 12, 2024, 4:20 PM IST

अमरावती Amravati Lok Sabha Election 2024 : बडनेरालगत जिरी येथील दत्त मंदिर परिसरात असणाऱ्या सभागृहात गुरुवारी रात्री साडेआठ वाजता बळवंत वानखडे यांच्या प्रचारासाठी बडनेराचे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उमेदवार बळवंत वानखडे यांच्यासह जिल्ह्याचे माजी पालकमंत्री उपस्थित होते. काँग्रेसचे नेते डॉक्टर सुनील देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे हे बैठकीसाठी पोहचले. दरम्यान, सभागृहात केवळ 15 ते 20 लोक होते. बडनेरासारख्या भागात नागरिकांची साधी गर्दी जमवता आली नाही, या संदर्भात सुनील खराटे यांनी ज्ञानेश्वर धाने यांना सुनावलं, त्यावरून दोघांमध्ये आधी शाब्दिक वाद झाला. त्यानंतर शाब्दिक वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. हा सगळा प्रकार पाहून उमेदवार बळवंत वानखडे यांची मात्र तारांबळ उडाली.

विधानसभा निवडणुकीची स्पर्धा : बडनेरा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने आणि जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्यात स्पर्धा आहे. दरम्यान, गुरुवारी ज्ञानेश्वर धाने यांनी आयोजित केलेल्या बैठकीला लोकांची उपस्थिती कमी असल्यामुळे सुनील खराटे यांनी आक्षेप घेतला. या दोघांमध्येही उमेदवारी मिळण्याची चुरस असल्यामुळे हा वाद विकोपाला गेल्याचं स्थानिक शिवसैनिकांचं मत आहे.

आमच्या वादाचा निवडणुकीवर परिणाम नाही : "गुरुवारी रात्री जे काही घडलं तो विषय आमच्या पक्षांतर्गतला आहे. या बैठकीला माजी नगरसेवक, महानगरप्रमुख, जिल्हाप्रमुख यापैकी कुणालाच निमंत्रण नव्हतं. उपस्थिती देखील नगण्य होती. सभेचं हे दृश्य आमच्या पक्षाची पत घालवणारं होतं. यामुळेच मी ज्ञानेश्वर धाने यांना विचारलं असता वाद झाला. हा आमचा पक्षांतर्गत विषय असून या वादामुळं महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या निवडणुकीवर कुठलाही परिणाम होणार नाही. बळवंत वानखडे यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सारे मेहनत घेत आहोत. त्याचा सकारात्मक निर्णय निवडणूक निकालात दिसेल," असं सुनील खराटे यांनी बोलताना सांगितलं.

हेही वाचा :

1 सरकारी यंत्रणा म्हणजे भाजपाचे कार्यालय झाले; नकली शिवसेनेवरुन अंबादास दानवेंची पंतप्रधान मोदींवर टीका - Ambadas Danve On Pm Modi

2 नाक रगडण्यासाठी मातोश्रीवर आला होतात, कोण नकली, कोण असली हे ठरवणारे तुम्ही कोण- राऊतांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल - Sanjay Raut News

3 राष्ट्रवादी पक्ष कुणाचा असली आणि कुणाचा नकली महाराष्ट्राच्या जनतेला ठरवू द्या - जयंत पाटील - Jayant Patil

Last Updated : Apr 12, 2024, 4:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.