ETV Bharat / state

आंब्यांसोबत इतर पिकांचीही भरभराट; शेतात चर खोदून अमरावतीच्या माजी महापौरांचा नवा प्रयोग - Agriculture News - AGRICULTURE NEWS

Agriculture News : राज्यातील शेतकरी शेतीमध्ये आता नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून शेती क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग होत आहेत. अमरावती शहराचे माजी महापौर आणि शेतकरी अशोक डोंगरे या शेतातील चर खोदून वेगळा प्रयोग केला. या संदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.

Agriculture News
अमरावतीच्या शेतकऱ्याचा नवा प्रयोग (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 18, 2024, 7:36 PM IST

अमरावती Agriculture News : कृषी क्षेत्रात सातत्यानं नवनवीन बदल होत आहेत. अनेक शेतकरी चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. असाच प्रयोग अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात येणाऱ्या केकतपूर येथील शेतकऱ्यानं केलाय. या शेतकऱ्यानं नेमका काय जुगाड केलाय जाणून घेऊया.

अमरावतीच्या शेतकऱ्याचा नवा प्रयोग (Source - ETV Bharat Reporter)

"शेती करून काही फायदा नाही. चांगले पैसे मिळत असेल तर विकून टाक. मोकळा हो, असा अनेकांनी सल्ला दिला. मात्र, चाळीस वर्षांपूर्वी घेतलेल्या शेतात गेल्या चार-पाच वर्षात प्रचंड मेहनत घेतली. शेतातून नाल्यात वाहून जाणारी लांब मोठी चर खोदून शेतातच पाणी मुरविण्याचा प्रयोग केला. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी मोठी चर खोदली त्या ठिकाणी विशिष्ट अंतरावर आजूबाजूनं आंब्याची 50 झाडं लावली. चरात साठणारं पाणी आंब्याच्या रोपांसोबत शेतातील इतर पिकांनादेखील मिळतं. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून शेतात घेतलेली मेहनत निश्चितच फायदेशीर ठरणार आहे," असा विश्वास केकतपूर येथील शेतकरी आणि अमरावती शहराचे माजी महापौर अशोक डोंगरे यांनी व्यक्त केला.

दोन शेतांच्या मधात खोदली चर : केकतपूर परिसरात अशोक डोंगरे यांची आठ एकर शेत जमीन आहे. आठपैकी चार-चार अशा दोन भागात ही जमीन विभक्त करण्यात आली आहे त्याच्या मध्यभागी पाच फूट अंतराची मोठी चर खोदली. यासोबत तेथील गवत काढून हा भाग स्वच्छ केला. या चरात आंब्याची एकूण 50 झाडं काही अंतरावर एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं लावण्यात आली. झाडे लावलेल्या ठिकाणी विशिष्ट अशा मजबूत अडीच फुटाच्या एकूण 50 प्लेट्स लावण्यात आल्या आहेत. या प्लेट्सचा अर्धा फूट भाग हा जमिनीत खोल गाडण्यात आला. या प्लेट्समुळेमधून वाहून जाणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होऊन हे पाणी अडून जमिनीत मुरते.

इतर पिकांनाही फायदा : "प्लेट्स चरात विशिष्ट अंतरावर लावण्यात आल्यामुळे वाहणारं पाणी अडवण्यास मदत होईल. आंब्याच्या झाडांना मुबलक पाण्यासाठी मिळणार आहे. शेताच्या बांधावर असणारी तूर आणि सोयाबीन यांनादेखील पाणी मिळणार आहे. या प्रयोगाचे खास वैशिष्ट्य म्हणजे शेतात लावलेल्या आंब्याच्या झाडांची काळजी केवळ मार्च, एप्रिल आणि मे असे तीन महिनेच घ्यावी लागणारे आहे," असे अशोक डोंगरे यांनी सांगितलं.

तीन वर्षात चांगले उत्पादन येणार : "यावर्षी शेतात आंब्याची 50 झाडं लावण्यात आली आहेत. पुढच्या वर्षीच या आंब्याला फळ येईल. पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी येणारी फळ तोडली जाणार नाही. तिसऱ्या वर्षी मात्र खऱ्या अर्थाने या वृक्षांना आंबे लागतील. तिसऱ्या वर्षी शेतात आंब्याचे चांगले उत्पादन येणार आहे. सर्वात आधी केकतपूर येथील प्रत्येक ग्रामस्थाला आमच्या शेतातील आंबा खाऊ घालणार आहे. त्यानंतरच आंब्याची विक्री करणार आहोत," असे अमरावतीचे माजी महापौर डोंगरे यांनी सांगितलं.

नाल्याचं केलं खोलीकरण : "शेताला लागूनच नाला आहे. पावसाळ्यात या नाल्याचं पाणी शेतात येत असल्यामुळे या भागातील शेतीसाठी ते अतिशय घातक ठरणार होतं. पावसाळ्यात शेतात पाणी तुंबत असल्यानं अनेक जणांना शेती करणं परवडत नव्हतं. आमच्या शेतातदेखील पावसाळ्यात पाणी तुंबत असल्यानं मोठी अडचण होती. या अडचणीवर मात करण्यासाठी यावर्षी उन्हाळ्यात शेतालगत वाहणाऱ्या नाल्याचं शेतकऱ्यांनी स्वतः खोलीकरण करून घेतलं. शेतातील पाण्याचा निचरा योग्यपणे व्हावा, यासाठी सर्व व्यवस्था केली. शेतात खोदलेला चर हा शेतातील पाणी व्यवस्थापनासाठी अतिशय महत्त्वाचा ठरला," असंदेखील अशोक डोंगरे यांनी सांगितलं.

स्वातंत्र्य दिनानिमित्त शेतात वृक्षारोपण : 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर शेतामध्ये खास सोहळा आयोजित करून एकूण 251 झाडांची लागवड अशोक डोंगरे यांनी केली. यामध्ये आंब्याच्या 50 वृक्षांसह सागवानची 70 कडुनिंबाची 50 यासह आवळा सिताफळ फणस यांचा समावेश आहे. यावेळी आपल्या शेतात काम करणाऱ्या सर्व शेतमजुरांचा विशेष सत्कार देखील अशोक डोंगरे यांनी केला.

हेही वाचा

  1. चुलीवरचा गरमागरम बरबटी वडा; मेळघाटातील घटांगचा खास ब्रँड - Ghatang Famous Barbati Wada
  2. असावा सुंदर प्लॅस्टिकचा बंगला... पुण्यात चक्क 85 हजार बॉटल्स वापरून बांधलं देखणं घर - Plastic Bottle house
  3. मेळघाटात कॉफी उत्पादन; चिखलदरा पाठोपाठ 84 वर्षानंतर 'कुकरू'च्या थंड हवेत बहरली कॉफीची बाग - Coffee Production

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.