ETV Bharat / state

मतदान यंत्रात अदलाबदलीचा आरोप; आमदार कैलास गोरंट्याल यांनी थांबवलं मतदान - MLA Kailas Gorantyal

MLA Kailas Gorantyal : जालना लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मतदान यंत्रात अदलाबदली केल्याचा आरोप आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला. डबल जिम भागामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांचं नाव खालीवर केल्याचा गंभीर आरोपही आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडं याची तक्रार देखील केली आहे.

MLA Kailas Gorantyal
कैलाश गोरंट्याल (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 13, 2024, 7:04 PM IST

ईव्हीएम अदलाबदलीविषयी शंका व्यक्त करताना आमदार कैलास गोरंट्याल (Reporter)

जालना MLA Kailas Gorantyal : आज सोमवार रोजी जालना लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 21.35% मतदान जालना लोकसभा मतदारसंघात झाल्याची अधिकृत माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र मतदान सुरू असताना जालना शहरातील डबल जिम भागामध्ये मतदान यंत्रात अदलाबदली झाल्यानं महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांचं नाव खाली-वर केल्याचा गंभीर आरोप जालना विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर केला.

वरिष्ठांकडं फोन कॉलवरून तक्रार : जोपर्यंत मतदान यंत्र सुरळीत जशाचं तसं करुन देत नाही, तोपर्यंत मतदान प्रक्रिया थांबवली असल्याची माहितीसुद्धा यावेळी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे. या संदर्भात त्यांनी फोन कॉलद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याची रीतसर तक्रार केली. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी यावेळी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे.

कैलास गोरंट्याल यांचे आरोप बिनबुडाचे : या सर्व प्रकाराला माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी उत्तर दिले आहे की, काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे; कारण मतदारांचा सर्व कल हा महायुतीचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे असल्यामुळे आमदार कैलास गोरंट्याल हे बिनबुडाचे आरोप करत आहेत, असा आरोप माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केला आहे.

मतदान प्रक्रियेत गडबडी करण्यात आल्याचा आरोप : जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणुकीची तयारी पूर्ण केलेली होती. मतदान प्रक्रियेत कुठेही गडबड होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरीही जालना लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेत गडबडी करण्यात आल्याचा आरोप आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला. अखेर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तोंडी तक्रार करून मतदान प्रक्रिया थांबविली. मतदान यंत्र सुरळीत जशाचे तसे करून देत नाही तोपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. दरम्यान अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.

हेही वाचा :

  1. अनवाणी पायांनी मतदान केंद्रात जात पद्मश्री राहीबाई पोपेरेंनी बजावला मतदानाचा हक्क - Lok Sabha Election 2024
  2. जालन्यात मतदान यंत्रांची अदलाबदल; आमदारानं थांबवलं मतदान - Lok Sabha election 2024 Phase 4
  3. "मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटपाकरिता हेलिकॉप्टरमधून १२ ते १३ कोटी रुपये नेले, लवकरच..."- संजय राऊतांचा आरोप - Sanjay Raut news today

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.