ETV Bharat / state

दोघांच्या भांडणात तिसरा! छत्रपती संभाजीनगर 'लोकसभा' यंदाही रंगणार, वाचा कोण आहे इच्छूक - Lok Sabha Election 2024

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election 2024 : राज्यातील सर्वांचं लक्ष असलेला हा मतदारसंघ मानला जातो. धार्मिक दृष्टिकोनातून मतदान करणाऱ्या मतदार संघात यंदा सर्वच पक्ष आपल नशिब अजमवण्याच्या तयारीत आहेत. 2019 लोकसभा निवडणुकीत एआयएमआयएम'चे उमेदवार सय्यद इम्तियाज जलील विजयी झाले. त्यांनी प्रस्थापित शिवसेना उमेदवार त्यावेळचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत सर्वांना धक्का दिला होता. यावेळी ठाकरे गटाचा हक्काचा समजल्या जाणाऱ्या मतदार संघात शिंदे गट किंवा भाजप नशिब आजमावणार आहेत. त्यामुळे मतदार कोणाला कौल देणार याबाबत जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

संभाजीनगरचे संभाव्य लोकसभा उमेदवार
संभाजीनगरचे संभाव्य लोकसभा उमेदवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2024, 9:06 PM IST

छत्रपती संभाजीनगर : Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2019 मध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, एमआयएम'चे सय्यद इम्तियाज जलील, अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव हे प्रमुख उमेदवार होते. शिवसेनेच्या हक्काच्या मतदार संघात एम आय एम पक्षानं मुसंडी मारत सर्वांना धक्का दिला. मतांचा विचार करता एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी 3,89,042. शिवसेना नेते (सध्या ठाकरे गटात) चंद्रकांत खैरे यांनी 3,84,550, शिवसेनेतून बंडखोरी केलेले त्यावेळचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष लढत 2,83,798 मत मिळवली. हर्षवर्धन जाधव यांनी मतांची विभागणी केल्याने चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. एकीकडे युतीत निवडणूक झाल्याने अनेक उमेदवारांनी लाखोंचं मताधिक्य घेत विजय मिळवला. मात्र, खैरे यांना काही हजारांनी पराभव स्वीकारावा लागला.

हर्षवर्धन जाधवांमुळे खैरे पराभूत : हर्षवर्धन जाधव केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. यांनी 2014 मधे शिवसेनेच्या वतीनं कन्नड विधानसभा निवडणूक जिंकली होती. मात्र, त्यानंतर पक्षातील नेते असलेले चंद्रकांत खैरे यांच्याशी वैयक्तिक वाद वाढले आणि त्यांनी 2019 लोकसभा निवडणुकीत खैरे यांच्या विरोधात दंड थोपटले. निवडणूक जिंकल्यावर भाजपाला साथ देणारं असं जाहीर करत भाजपा पुरस्कृत मत त्यांनी आपल्याकडं खेचले. अर्थात युती असली तरी अप्रत्यक्षपणे भाजपा नेते रावसाहेब दानवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन जाधव यांना मदत केली. त्यामुळे विजय मिळवण्याची क्षमता असूनही खैरे यांना अवघ्या काही मतांनी हार पत्करावी लागली.

मतदार संघात जातीय समीकरण महत्वाचे : छत्रपती संभाजीनगर मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्र आहेत. ज्यामधे मध्य, पूर्व, पश्चिम, गंगापूर, वैजापूर, कन्नड हे मतदार संघ येतात. या मतदार संघात मराठा मुस्लिम आणि ओबीसी मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. मतदारांमध्ये अंदाजे 20 ते 22 टक्के मुस्लिम मतदार आहेत. वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित सोबत एआयएमआयएम'ने केलेल्या युतीमुळे दलित, ओबीसी, मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात एकवटल्याने एआयएमआयएम पक्षाला ताकद मिळाली. एकगठ्ठा मतदान मिळाल्यानं जलील निवडणूक जिंकले आणि प्रस्थापितांना मोठा धक्का बसला.

जवळपास 3 लाख मत मिळाली : 2024 लोकसभा निवडणुकीत रस्सीखेच : 2024 लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट शिवसेनेतर्फे चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे, एमआयएम पक्षातर्फे विद्यमान खासदार इम्तियाज जलील आणि गफार कादरी, शिंदे गट शिवसेना संदीपान भुमरे, भाजपा तर्फे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची नावं चर्चेत आहेत. तर इतर काही लोक निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते म्हणून चंद्रकांत खैरे हे आघाडीचे नेते मानले जातात. हिंदुत्ववादी संघटनेचे नेते असल्याचं त्यांनी वारंवार सांगितलं आहे. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतल्यानं मतांची विभागणी झाली. त्यांना जवळपास 3 लाख मतं मिळाली होती.

ठाकरे जो निर्णय घेतील तो मान्य करू : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर आमदार संदिपान भुमरे हे त्यांच्या सोबत गेले. त्यांनी शहरात शिंदे गटाचे नेते म्हणून नवीन ओळख उभी केली आहे. चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात अनेकवेळा भुमरे यांनी वक्तव्य करत आपण वरचढ असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर शिवसेनेचा किल्ला असलेल्या मतदार संघात आता भाजपाची ताकद वाढली असल्याचं सांगत भाजपा आपला नशीब आजमावणार असे संकेत केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी दिले आणि आपण उमेदवार असल्याटं सांगत त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे. त्यामुळे ते देखील वेगळ्या प्रकारे या भागात काम करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. यावेळी एमआयएम मुंबईतून लोकसभा लढवणार असल्याचं सांगत आपण तिकडून निवडणूक लढवणार असल्याची इच्छा इम्तियाज जलील यांनी व्यक्त केल्याने त्यांच्या जागी गफार कादरी यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ठाकरे गटातर्फे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे देखील तयारी करत असल्याची चर्चा आहे. मात्र, "उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो मान्य करू" असं दानवे आणि खैरे यांनी सांगितलं आहे.

पुन्हा जातीय मुद्द्यांवर प्रचार : मागील पाच वर्षात शहराचा किंवा जिल्ह्याचा म्हणावा तसा बदल झाला नाही. औद्योगिकदृष्ट्या अनेक प्रकल्प येणं अपेक्षित होतं. तर ऐतिहासिक दृष्टिकोनातून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी पर्यटनाच्या दृष्टीने काही प्रश्न उपस्थितीत केले. ज्यामधे विमान सेवा आणि रस्ते यांच्या बाबतीत काही मुद्दे प्रामुख्याने उपस्थितीत करत शहराला महत्त्व वाढवण्यासाठी प्रयत्न केले. ऐतिहासिक तसंच, औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचं शहर म्हणून औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची ओळख आहे. या मतदार संघात जातीय राजकारण मोठ्या प्रमाणात होत असते. जातीय दंगलीचा इतिहास असलेले शहर असल्याने त्याचे तोटे देखील शहराला झाले. 2024 लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा जातीय मुद्दे प्रामुख्याने समोर येण्याची शक्यता आहे. शहराचं नामकरण संभाजीनगर झाल्यावर जातीय समीकरण बदलली आहेत. त्यात राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानंतर पुन्हा जातीय मुद्दे समोर येतील. हिंदू समीकरण असलेले पक्ष विरोधात मुस्लिम मतांवर डोळा असलेले पक्ष असे समीकरण जुळून येतील असं चित्र आहे.

मराठा मतदार असेल लक्ष्य : मराठा आंदोलनामुळे अनेक राजकीय गणित बदलतील अशी शक्यता आहे. मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा लढा तीव्र आहे. मागील काही वर्षांमध्ये इतर समाजाच्या नेत्यांना होणारा विरोध आणि प्रत्येक विधानसभा मतदार क्षेत्रात असणारे जातीय समीकरण पाहता, प्रत्येक पक्ष आता मराठा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. काही पक्षांकडे मराठा चेहरा नाही, तर इतर पक्षातून किंवा सामाजिक क्षेत्रातून ओळखीच्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत चाचपणी होत असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा :

1 नांदेडमध्ये काँग्रेसला धक्का : अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात 55 माजी नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश

2 वरळी कुणाचाही बालेकिल्ला नाही, राहुल नार्वेकर यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

3 "तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, पण महाराष्ट्रात", चंद्रकांत पाटलांची टोलेबोजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.