ETV Bharat / state

"कोणीही नाराज...."; नाराजी नाट्यावर अजित पवारांनी थेटच सांगितलं - Ajit Pawar - AJIT PAWAR

Ajit Pawar : सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती. याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी कोणीही नाराज नसल्याचं सांगितलं आहे.

Ajit Pawar - Chhagan Bhujbal
अजित पवार-छगन भुजबळ (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 14, 2024, 5:59 PM IST

पुणे Ajit Pawar : अजित पवार यांच्या पक्षाच्यावतीनं काल त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. याबाबत पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे की, कोणीही नाराज नाही. विरोधक किंवा आमचे जवळचे मित्र यांनी त्या बातम्या पेरल्या आहेत. राज्यसभेसाठी एकमेव अर्ज दाखल झाला असून तो अर्ज देखील मंजूर झाला आहे. आता उमेदवाराने माघार घेतली नाही तर ते बिनविरोध खासदार झाले आहे. कोणी काय टीका करावी तो त्यांचा अधिकार असल्याचं यावेळी अजित पवार म्हणाले.

पक्षातील नाराजीवर स्पष्टीकरण देताना अजित पवार (ETV Bharat Reporter)

कांदा प्रश्नांमुळे महायुतीला फटका? : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज (14 जून) पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय येथे विविध विषयांवर बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. नुकतचं झालेल्या लोकसभा निवडणुकीत कांदा प्रश्नांमुळे महायुतीला फटका बसला असल्याचं पियूष गोयल यांना सांगितलं आहे. याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, कांदा उत्पादकांमध्ये नाराजी होती आणि त्याची किंमत आम्हाला लोकसभा निवडणुकीला बसली आहे. जळगाव, रावेर जागा सोडली तर सगळीकडे फटका बसला आहे. नगर, नाशिक, पुणे, सोलापूर मध्ये कांदा उत्पादक आहेत, असं यावेळी पवार म्हणाले.

वारकऱ्यांसाठी सुविधांचे नियोजन करा : आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान पंढरपूर, पालखी मार्ग, पालखी तळ आदी ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच पालखी सोहळ्यासाठी फिरते शौचालय आणि टँकरची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी. शौचालयाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे. राज्य शासनाकडून पालखी सोहळ्यासाठी आवश्यक कामासाठी उपलब्ध करून देण्यात येणारा निधी प्राप्त होईपर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खर्च करावा, असं यावेळी अजित पवार म्हणाले.

पालखी सोहळ्यासाठी असणार ही सुविधा : पालखी सोहळ्यासाठी ३ हजारपेक्षा अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जेजुरी पालखी तळाची कामे सुरू करण्यात आली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी १ हजार ८००, श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी १ हजार २०० आणि संत सोपान महाराज पालखी सोहळ्यासाठी २५० शौचालयांची सुविधा करण्यात येणार आहे.

सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्यासाठी सूचना : अजित पवार म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांच्या सोबत आज झालेल्या बैठकीत महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली भिडेवाडा येथील पहिली मुलींची शाळा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक ती प्रक्रिया करून गतीने निविदा प्रक्रिया राबवावी, असे निर्देश देण्यात आले आहे. तसेच हे स्मारक पार्किंग तसेच तळमजला अधिक तीन असे चार मजल्यांचं करण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला. पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, त्यांचा जीवनपट दर्शविणारे म्युरल्स किंवा चित्रमय व्यवस्था, वरील मजल्यावर त्यांच्या जीवनातील प्रसंग, कार्याची माहिती स्क्रीनवर दृकश्राव्य स्वरुपात दर्शविण्याची यंत्रणा तसेच त्यांचे लेखन साहित्य त्याशिवाय वरील मजल्यावर मुली, महिलांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्था अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

  1. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारण्यासाठी देवेंद्र फडणवीस लागले कामाला; निवडणुकीसाठी कसली कंबर - Devendra Fadnavis
  2. जे अहंकारी होते त्यांना प्रभू रामानं 240 वर अडवलं - इंद्रेश कुमार यांचा भाजपाला टोला - RSS Leader Dig At BJP
  3. पिंपरी चिंचवड शहरात हिट अँड रन; भरधाव कारनं महिलेला उडवलं, घटनास्थळावरुन पळ काढणाऱ्या पोलिसाच्या मुलाला ठोकल्या बेड्या - Pimpri Chinchwad Hit And Run Case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.