नागपूर Prepaid Meter Issue : नागरिक संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रीपेड मीटर विरोधात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता; मात्र पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करण्यास परवानगी नाकारल्यानं व्हेरायटी चौक येथे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात जय विदर्भ पार्टीसह विविध संघटनांचा संघर्ष समितीत सहभाग होता.
आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की : आंदोलक कुठल्याही परिस्थितीत फडणवीस यांच्या घराकडे जाणार नाहीत, याची दक्षता घेत पोलिसांकडून व्हेरायटी चौकावर मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. संतप्त आंदोलकांनी ऊर्जामंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान पोलिसांनी पुतळा जाळण्यापासून रोखला आणि अग्निशमन दलाने पाण्याचा फवारा मारून आग विझवली. त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती. पोलिसांनी प्रीपेड स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या घराची सुरक्षा वाढवली : स्मार्ट मिटर विरोधात आंदोलक ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घराची सुरक्षा वाढवली आहे. संघर्ष समितीने फडणवीस यांच्या घरापुढे आंदोलनाची परवानगी मागितली होती; परंतु पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आंदोलकांनी व्हेरायटी चौकात आंदोलन केले.
मीटर बसवण्यासाठी एवढ्या कोटीच्या खर्चाची निविदा : महावितरणचे सध्याचे विद्युत मीटर कालबाह्य होणार आहेत. जुन्या पारंपरिक मीटरची जागा प्रीपेड स्मार्ट मीटर घेणार आहे. राज्यभरात २ कोटी ४१ लाख ग्राहकांचे, तर अहमदनगर जिल्ह्यात ६ लाख ३६ हजार १९२ ग्राहकांचे विद्युत मीटर बदलणार आहेत. येत्या तीन-चार महिन्यांत जिल्ह्यातील मीटर बदलण्याची मोहीम सुरू होईल. जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्यासाठी ७१७.३८ कोटींच्या खर्चाची निविदा प्रक्रिया होऊन नागार्जुन कन्स्ट्रकठान लिमिटेड यांना ७ ऑगस्ट २०२३ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. कामाचा कालावधी २७ महिन्यांचा आहे.
ग्राहकांचे गणित बिघडणार : शेतीचे वीजग्राहक वगळता घरगुती, व्यापारी, औद्योगिक वीजग्राहकांसह फीडर आणि रोहित्रांवरसुद्धा स्मार्ट मीटर बसविले जाणार आहेत. त्यादृष्टीने ठेकेदाराने फीडर आणि रोहित्रांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. स्मार्ट मीटर बसविल्यावर वीजग्राहकांना मोबाईल फोनप्रमाणे विजेसाठी पैसे भरावे लागतील. किती वीज वापरली, किती रक्कम शिल्लक आहे. याची माहिती ग्राहकांना मोबाईल फोनवर मिळेल. त्यामुळे आर्थिक नियोजनानुसार वीज वापर किती करायचा हेसुद्धा ग्राहकांना समजणार आहे. सध्याच्या पद्धतीत मीटर रिडींग घेऊन मोठे बिल आल्यावर ग्राहकांचे गणित बिघडते.
हेही वाचा :
- पंतप्रधान आणि गृहमंत्री जम्मू-काश्मीरला भेट देणार नाहीत का? उद्धव ठाकरेंचा सवाल - Maharashtra live update news
- मणिपूरबाबत भागवत बोलल्यानंतर आता तरी मोदी मणिपूरला जाणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल - Uddhav Thackeray On PM Modi
- 'वक्फ' मंडळासाठी आर्थिक तरतूदीच्या निर्णयाचा 'विहिंप'कडून निषेध; राज्यभरात मोर्चे काढण्याचाही इशारा - VHP on waqf Board