मुंबई Aditya Thackeray On BJP : लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) पार पडल्यानंतर आता राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यात आगामी काळात विधनासभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या धरतीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून रणनिती आखली जात आहे. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गटाचे) आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) मुंबईतील आपल्या वरळी मतदारसंघातून मोठं वक्तव्य केलंय.
कमळ फुलणार नाही : "वरळी मतदारसंघात कमळ फुलू देणार नाही, वरळी ए प्लस होत आहे. वरळीत चांगल काम होत आहे. सगळे बघायला येतील त्यांचं स्वागत आहे", असं आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. तसेच वरळीत मोठ-मोठ्या लोकांनी रोड शो केले तरी चालतील. मोठा प्रचार केला तरी चालेल, कितीही वरळीत प्रयत्न केले तरी वरळीत कमळ येऊ देणार नाही, असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी केलाय.
घाबरुन दुसरा मतदारसंघ शोधतील : दुसरीकडं आदित्य ठाकरेंनी विरोधकांवर केलेल्या टीकेला प्रतिउत्तर देताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, आदित्य ठाकरे हे पुढच्या वेळेस वरळीमध्ये उभे राहतात का नाही? हाच एक मोठा प्रश्न आहे. का दुसरा मतदारसंघ घाबरुन शोधतात.
संदीप देशपांडेंना वरळीतून उमेदवारी? : लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडं मुंबईतील चर्चेत असलेला वरळी मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.
हेही वाचा -