ETV Bharat / state

अभिनेत्री स्वरा भास्कर निवडणुकीच्या रिंगणात; मुंब्रा कळवा मतदार संघात जितेंद्र आव्हाड यांना देणार धक्का ? - Swara Bhaskar To Contest Election - SWARA BHASKAR TO CONTEST ELECTION

Swara Bhaskar To Contest Election : अभिनेत्री स्वरा भास्कर ही विधानसभा निवडणूक 2024 च्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. स्वरा भास्कर ही मुंब्रा कळवा मतदार संघातून समाजवादी पक्षाच्या तिकीटावर लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत तिचे पती तथा समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद यांनी "याबाबत सध्याच काही सांगू शकत नाही, पक्षाध्यक्ष जो आदेश देतील, त्याचं पालन करु' असं स्पष्ट केलं.

Swara Bhaskar To Contest Election
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 9, 2024, 11:37 AM IST

मुंबई Swara Bhaskar To Contest Election : अभिनेत्री स्वरा भास्कर समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांनी स्वतः याबाबत संकेत दिले आहेत. सध्या या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आमदार आहेत. अभिनेत्री स्वरा भास्कर मुंब्रा कळवा मतदार संघातून समाज वादी पक्षाच्या तिकीटावर निवढणूक लढवणार आहे, अशी माहिती स्वरा भास्करचे पती तथा समाजवादी पक्षाचे युवक अध्यक्ष फहाद अहमद यांनी "स्वरा भास्करच्या निवडणूक लढण्याबाबत सध्याच काही काही सांगू शकत नाही," असं स्पष्ट केलं आहे.

Swara Bhaskar To Contest Election
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

माझ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मला ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवायला सांगतील त्या मतदारसंघातून मी निवडणूक लढवीन. त्यासाठी मी पूर्ण तयार आहे. माझी पत्नी स्वरा सध्या राजकारणात नाही. त्यामुळे तिच्याबद्दल मी सध्या काही सांगू शकत नाही. - फहाद अहमद, अध्यक्ष, समाजवादी पक्ष युवक आघाडी

चर्चा फिस्कटली तर स्वराची उमेदवारी निश्चित : समाजवादी पक्ष महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत आहे. मात्र सध्या महाविकास आघाडीत त्यांना पुरेसा सन्मान मिळत नसल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. याबाबत अबू आझमी यांनी यापूर्वी देखील नाराजी व्यक्त केली. पक्षाध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांच्याकडं याबाबत माहिती दिली आहे. स्वरा भास्कर ही सामाजिक, राजकीय क्षेत्रातील घडामोडींवर सातत्यानं आपलं मतप्रदर्शन करते. तिचे पती फहाद अहमद हे समाजवादी पक्षाच्या युवा शाखेचे अध्यक्ष आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये स्वरा आणि फहाद यांचं लग्न झालं. या लग्नामध्ये अबू आझमी सहभागी झाले होते. महाविकास आघाडीसोबत चर्चा फिसकटली तर स्वरा भास्करची उमेदवारी निश्चित असल्याचं मानलं जात आहे.

जागा वाटपांवरुन सखोल चर्चा नाही : महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत अद्याप सखोल चर्चा झालेली नाही. या जागा वाटपात समाजवादी पक्षाला योग्य तो हिस्सा मिळावा, अशी अबू आझमी यांची मागणी आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये समाजवादी पक्षाला पुरेसा हिस्सा मिळाला नाही. योग्य मतदारसंघ मिळाले नाहीत, तर समाजवादी पक्ष स्वबळावर लढेल, अशी माहिती अबू आझमींनी दिली. अशा परिस्थितीत स्वरा भास्कर ही मुंब्रा कळवा मतदारसंघातून समाजवादी पक्षाची उमेदवार असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांना या मतदारसंघातून लढण्यासाठी तयारी करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांना भेटी देण्यात आल्या आहेत. त्यासह तेथील समस्या जाणून घेऊन संपर्क वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्याच्या माहितीला समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून दुजोरा मिळाला आहे. सध्या समाजवादी पक्षाचे मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून अबू आझमी आणि भिवंडी पूर्व मतदारसंघातून रईस शेख हे दोन आमदार आहेत.

मुंब्रा कळवा मतदारसंघाची निवड का : मुस्लीम बहुल असलेल्या मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणं जास्त लाभदायक ठरु शकते. त्यामुळे स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी या मतदारसंघाची निवड केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मुंब्रा कळवा मतदार संघातील विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यापुढील अडचणी वाढवण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. Swara Bhaskar Baby Girl : स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांना कन्यारत्न...
  2. Post written by Swara Bhaskar : 'ती गाझामध्ये जन्मली असती तर..', मुलीसाठी स्वरा भास्करनं लिहिलं पोस्ट
  3. स्वरा भास्करने भारत जोडो यात्रेत राहुल गांधींना दिली गुलाबाची फुले, चर्चेला उधान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.