ETV Bharat / state

पालघरमध्ये माकडानं आत्महत्या केल्याची अफवा; खरं कारण आलं समोर - Monkey Dies In Accident

पालघरमधील सफाळे भागात माकडाचा अपघाती मृत्यू झालाय. मात्र, माकडानं गळफाश घेत आत्महत्या केल्याची अफवा तालुक्यात पसरली आहे. काय आहे नेमकं प्रकरण? वाचा....

MONKEY DIES IN ACCIDENT
माकडानं आत्महत्या केल्याची अफवा (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2024, 4:16 PM IST

पालघर : तालुक्यातील सफाळे भागात असलेल्या तांदुळवाडी घाटात एका माकडाचा अपघाती मृत्यू झाला. ब्लाऊजच्या कपड्याचा त्याच्या गळ्याला फास बसून त्याचा जीव गेल्याचं सांगितलं जातंय. माकडाच्या या अपघाती मृत्यूनंतर काही ठिकाणी माकडाने गळफास घेतल्याच्या अफवा पसरल्यानंतर त्याची सर्वत्र चर्चा झाली. त्यावर प्राणीमित्रांनी नाराजी व्यक्त केलीय.

माणूस आत्महत्या करु शकतो, मात्र प्राणी कधीही आत्महत्या करत नाहीत. कोणतीही प्रतिकूल परिस्थिती आली, तरी त्यावर मात करण्याची उपजत वृत्ती प्राण्यांकडं असते. कितीही संकटं आली, तरी संघर्ष करत त्या संकटावर ते मात करत असतात. तसंच प्राण्यांना माणसासारखी विचार करण्याची बुद्धी नसते. त्यामुळं मनोधैर्य खचण्याचा प्रश्नच येत नाही. माणसं मात्र परिस्थितीला शरण जातात. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे धैर्य त्यांच्यात राहत नाही. संघर्ष करण्याची वृत्ती त्यांची संपते.

"प्राणी कधीच आत्महत्या करत नाहीत. त्यामुळं घाटात माकडानं केलेली आत्महत्येबाबत जी चर्चा चालू आहे, ती चुकीची आहे. घाटात किंवा रस्त्यावर कोणीही कोणतेही अन्नपदार्थ टाकू नये. त्याचा माकडांना नाहक त्रास होऊन जीव गमवावा लागतो." - प्रशांत मानकर, सर्पमित्र सफाळे रेस्क्यू टीम

जगण्याचा चिवट संघर्ष : जगण्याचा संघर्ष चिवट असतो. प्राणी हा संघर्ष करत असतात. माणूस मात्र संघर्षातून पलायन करण्याचा मार्ग म्हणजे आत्महत्या स्वीकारतो. आत्महत्येनं प्रश्न सुटत नाहीत, हे आत्महत्या करणाऱ्यांना समजत नाही. प्राण्यांचं तसं नसतं. ते स्वतः संघर्ष करतात आणि आपल्या संघर्षातून इतरांना जगण्याचे धडे घालून देतात. या पार्श्वभूमीवर पालघर तालुक्यातील सफाळे परिसरात असलेल्या तांदुळवाडी घाटातील माकडाचा अपघाती मृत्यू चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरला आहे.

माणसामुळं प्राण्यांचं जगणं अवघड : माणसं ही प्राण्यांचं जगणं मुश्किल करतात. त्यासाठी नको ती भूतदया दाखवली जाते आणि त्यातून प्राण्यांचे मृत्यू होतात, हे त्यांच्या लक्षात येत नाही. पाळीव प्राणी असो किंवा जंगली प्राणी; त्यांना त्यांचे खाद्य खाऊ द्यावे. माणसाचे अन्न त्याला देऊ नये; परंतु माणूस आता माकडांना आपल्याकडचं अन्न देत आहेत. त्यात बिस्किटांसारखे अनेक पदार्थ खायला दिले जातात. त्याचा प्राण्यांच्या पचन यंत्रणेवर आणि जीवनावरही परिणाम होत असतो, हे त्यांच्या लक्षात येत नाही, असं प्राणीमित्र सांगतात.

का होतात अपघात? : अनेकदा रस्त्याच्या कडेला अन्न टाकलं जातं. हे अन्न मिळवण्याच्या प्रयत्नात प्राणी रस्त्यानं वेगानं येतात आणि अनेकदा विविध वाहनांखाली सापडून त्यांचे बळी जातात. प्राण्यांना त्यांचे अन्न शोधू दिले पाहिजे आणि त्यांचे अन्न जंगलात सुरक्षित राहील, याची काळजी माणसांनी घेतली पाहिजे; परंतु ती घेतली जात नाही. त्यातूनच तांदुळवाडीसारख्या घटना घडतात. तांदुळवाडी घाटात रस्त्याशेजारी टाकलेल्या ब्लाऊजच्या कपड्याशी झाडावर खेळता खेळता माकडाच्या गळ्याला त्या कपड्याचा फास बसून त्याचा मृत्यू झाला. झाडावरून उड्या मारताना कदाचित ब्लाऊजचा कपडा त्याच्या मानेत अडकला असावा, अशी शक्यता प्राणीमित्रांनी व्यक्त केली.

वनविभाग, सर्पमित्रांनी उरकले सोपस्कार : या घटनेची माहिती मिळतात वनविभागाचे अधिकारी सुशील म्हात्रे, विष्णुदास केदार आणि सफाळे येथील सर्पमित्र रेस्क्यू टीमनं घटनास्थळी धाव घेतली आणि गळफास बसलेल्या माकडाला झाडावरून खाली उतरवलं. त्यानंतर त्याचं दफन करण्यात आलं.

हेही वाचा

  1. नागपूर रेल्वे स्थानकातील प्रवाशांवर मनोरुग्णानं केला हल्ला; दोघांचा जागीच मृत्यू - Nagpur Railway Station Attacked
  2. मुंबईत आजपासून भुयारी मेट्रो सेवा प्रवाशांच्या सेवेत, जाणून घ्या वेळापत्रक अन् भाडं - Mumbai Metro Phase 3
  3. पोलीस ठाण्यावर दगडफेक करणारे 18 आरोपी अटकेत; 'वर्दी'ला घाबरून अनेक आरोपी 'अंडरग्राउंड' - Stone Pelting at Amravati

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.