ETV Bharat / state

मान्सूनमध्ये महाराष्ट्रात सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडण्याची शक्यता; शेतकऱ्यांनी कधी पेरणी करावी? - Maharashtra Weather Forecast

Average Rainfall In Maharashtra : यंदाच्या मान्सूनमध्ये महाराष्ट्रात सरासरीच्या 99% पाऊस होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केलीय. त्यामुळं शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असं आवाहन हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी केलंय.

Average Rainfall In Maharashtra
रामचंद्र साबळे (Reporter ETV Bharat Maharashtra)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 2, 2024, 3:58 PM IST

Updated : Jun 2, 2024, 4:05 PM IST

पुणे Average Rainfall in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात उन्हाचा चटका, तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस पाहायला मिळत आहे. केरळमध्ये यंदा मान्सून लवकरच दाखल झाला असून, महाराष्ट्रात पावसाचं आगमन देखील लवकर होणार आहे.यंदाच्या या मान्सूनमध्ये महाराष्ट्रात सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडण्याची शक्यता, हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे.

रामचंद्र साबळे यांची प्रतिक्रिया (Reporter ETV Bharat Maharashtra)

महाराष्ट्रात सरासरीच्या 99% पाऊस : राज्यातील पावसाचा अंदाज काय असणार आहे, याबाबत डॉ.रामचंद्र साबळे यांची पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी रामचंद्र साबळे म्हणाले, महाराष्ट्रात सरासरीच्या 99% पाऊस होण्याची शक्यता आहे. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ, दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग, सुर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारीत आहे.

असा असणार पाऊस : वाऱ्याचा वेग, सुर्यप्रकाशाचा कालावधी, तापमान कमी आढळल्यानं जुन, जुलै महिन्यात धुळे, राहुरी, अकोला, पाडेगाव, शिंदेवाही, पुणे, कोल्हापुर येथे पावसात मोठा खंड राहण्याची शक्यता आहे. तसंच दापोली, नागपूर, निफाड, सोलापुर, जळगाव, परभणी इथं पावसाच्या खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पावसाचं प्रमाण अधिक राहील, असं हवामान अंदाज साबळे यांनी व्यक्त केलाय. राज्यात यंदा पश्चिम विदर्भात 98, मध्य विदर्भात 98, तर पूर्व विदर्भात 103, मराठवाडा विभागात 97, कोकण विभागात 106, उत्तर महाराष्ट्रामध्ये 98, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 97 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना आवाहन : यंदा मान्सूनमध्ये मोठा खंड पडणार असल्याची शक्यता असून शेती व्यवसाय दिवसेंदिवस हवामानामुळं प्रभावित होत आहे. जिथं जास्त पाऊस झाला, तिथंच शेतकऱ्यांनी पेरणी केली पाहिजे. जिथं कमी पाऊस आहे, तिथं पेरणी करू नये. तसंच पीक घेताना देखील काळजी घेतली पाहिजे, असं रामचंद्र साबळे म्हणाले.

हे वाचलंत का :

  1. मान्सूनपूर्वी मुंबई मेट्रो सज्ज, प्रवाशांच्या सुरक्षेकरिता आपत्कालीन नियंत्रण कक्षाची सुरुवात - Mumbai Mansoon
  2. काँग्रेसच्या दुष्काळ पाहणी समितीची आज कराडमध्ये बैठक, पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व आमदार राहणार उपस्थित - drought in maharashtra 2024
  3. मुंबईकरांचे हाल करणाऱ्या मेगा ब्लॉकचा आज शेवटचा दिवस, प्रवाशांच्या सुरक्षेकरिता रेल्वेकडून 'ही' कामे सुरू - Mumbai mega block today

Last Updated : Jun 2, 2024, 4:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.