ETV Bharat / state

"मालवणमधील 'तो' पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा..."; आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप; वाद पेटणार? - Chhatrapati Shivaji Maharaj Statue - CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ STATUE

Aaditya Thackeray On Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष केलंय. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सदर पुतळा महाराजांचा वाटत नसल्याचा गंभीर आरोप केलाय.

Aaditya Thackeray alleged that the statue in Malvan did not look like Chhatrapati Shivaji Maharaj
आदित्य ठाकरे (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2024, 9:17 PM IST

Updated : Aug 27, 2024, 9:28 PM IST

मुंबई Aaditya Thackeray On Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मालवणमधील सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना सोमवारी (26 ऑगस्ट) दुपारी घडल्यानंतर राज्यभरातील शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. तसंच या मुद्द्यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत असल्याचं बघायला मिळतंय. असं असतानाच आता "मालवणमधील उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा महाराजांसारखा दिसतच नव्हता", असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलाय. आदित्य ठाकरेंच्या या आरोपावर आता महायुतीचे नेते काय प्रतिक्रिया देतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

आदित्य ठाकरे प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे? : या संदर्भात आज (27 ऑगस्ट) मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "ज्या मूर्तिकारानं मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला होता, त्यांना खरंच मूर्ती बनविण्याचा अनुभव होता का? कारण पुतळ्याचं प्रपोर्शन थोडं वेगळंच होतं. खरं तर तो पुतळा महाराजांसारखा वाटतंच नव्हता. मग त्या मूर्तिकाराला काम का दिले गेलं? पुतळ्याला डागडूजीची गरज का पडली? त्यावर गुन्हा दाखल झाला का? अटक करण्यात आली का?", असे अनेक प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केले.

मुंबईतील पुलांचं काय होणार? : पुढं ते म्हणाले की, "हे खरंच दुर्दैव आहे की, भाजपाला या कामातही भ्रष्टाचार करावासा वाटला. महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात आम्ही राजकारण करतोय असा आरोप सत्ताधारी नेते करताय. मात्र, ज्याप्रकारे 45 किलोमीटर पर तासी वेगाच्या वाऱ्यामुळं पुतळा पडल्याचं सांगितलं जातंय. त्यानुसार राज्यातील आणि मुंबईतील पुलांचं काय होणार? या कामात देखील कंत्राटदाराला 100 टक्के एक्सलेशन मिळाला आहे", असा दावा देखील त्यांनी केला.

हेही वाचा -

  1. छत्रपती शिवाजी महाराजांनी 360 वर्षांपूर्वी बांधलेला राजकोट किल्ला आजही दिमाखात उभा; कशी आहे त्याची रचना? - Chhatrapati Shivaji Maharaj Forts
  2. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना; आशिष शेलारांनी मागितली माफी, तर फडणवीस म्हणाले, "कोथळा बाहेर काढू" - Chhatrapati Shivaji Maharaj Statue
  3. मालवण पुतळा दुर्घटना; सरकारकडून हात झटकण्याचा प्रयत्न, निकृष्ट बांधकामावर शिवप्रेमी संतप्त - Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Last Updated : Aug 27, 2024, 9:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.