सोलापूर (पंढरपूर) Vitthal Darshan In Pandharpur : पंढरपूरमध्ये आषाढी कार्तिकी एका सोहळा मोठ्या उत्साहामध्ये नुकताच संपन्न झाला. या आषाढी एकादशीसाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून तब्बल 20 लाख भाविक दाखल झाल्याचा प्रशासनाचा अंदाज होता. आजपर्यंतची सर्वांत मोठी आषाढी एकादशीसाठी गर्दी झाल्याचं चित्र पंढरपूरमध्ये पाहावयास मिळत होतं. आषाढी एकादशी पूर्वी 7 जुलै पासून विठ्ठलाचे दर्शन 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीच्यावतीनं घेण्यात आला होता. 6 जुलै ते 18 जुलै या बारा दिवसाच्या कालावधीमध्ये दिवसांमध्ये तब्बल 9 लाख, 62 हजार 249 विठ्ठल भक्तांनी विठ्ठलाचे पदस्पर्श आणि मुखदर्शन घेतल्याची नोंद मंदिर समितीकडे झाली आहे.
'या' कुटुंबीयांना मिळाला मानाच्या पूजेचा मान : या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. मंदिर समितीनेही भक्तांसाठी विविध उपाययोजना करत दर्शन मंडप उभा केला होता. त्यामध्ये 12 पत्रा शेड उभारले होते. पत्रा शेठमध्ये भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी, चहा, कुलर, विश्रांती कक्ष या सुविधा देण्यात आल्या होत्या. 7 जुलैपासून विठ्ठलाचे दर्शन चोवीस तास मंदिरी समितीच्यावतीनं सुरू ठेवण्यात आलं होतं. तसेच यात्रा कालावधीमध्ये व्हीआयपी दर्शन हे बंद केल्यानं पदस्पर्श दर्शन घेण्याचा वेग वाढल्याचेही मंदिर समितीच्यावतीनं सांगण्यात आलं. आषाढी यात्रा सुरू होण्याच्या दोन दिवस अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये येऊन आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेत प्रशासनाला योग्य सूचना दिल्या आणि प्रशासनाने त्याची अंमलबजावणी केल्याचे दिसून आले. आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा करण्यात आली तसेच नाशिक जिल्ह्यातील अहिरे कुटुंबांनाही मानाच्या कार्याचा मान मिळाला होता.
पहिल्यांदात एवढ्या संख्येनं दर्शनाचा विक्रम : बारा दिवसांमध्ये विठ्ठलाचे तब्बल नऊ लाख भाविकांनी दर्शन घेतल्याची घटना इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे. 6 जुलै ते 18 जुलै या कालावधीतीलही मंदिर समितीने आकडेवारी प्रसिद्धी केली आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन लवकर झाल्यानं आणि अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्यानं गर्दी झाल्याचं दिसून येत होतं.
हेही वाचा :
- 'या' दोन जिल्ह्यातील प्रति पंढरपूर मंदिरात आषाढी एकादशी साजरी; विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी - Ashadhi Ekadashi 2024
- आषाढी एकादशीच्या सोहळ्यास उत्साहात सुरुवात; विठूरायाच्या पंढरीत भाविकांची मांदियाळी - Ashadhi Wari 2024
- वडाळा प्रति पंढरपूर मंदिरात विठूरायांच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी - Ashadhi Ekadashi