धाराशिव Poisoned In Dharashiv : कळंब तालुक्यातील परतापूर गावात स्वाती तानाजी गायकवाड यांच्या घरी महिलांचा सुवासिनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जेवणात पुरणपोळी खाल्ल्याने 35 महिलांना विषबाधा झाली. सदरील घटनेत दोन लहान मुलांचा आणि दोन पुरुषांचाही समावेश आहे. या सर्वांना धाराशिवच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सुवासिनीचा कार्यक्रमात झाली विषबाधा : रविवारी सायंकाळी स्वाती तानाजी गायकवाड यांच्या घरी सुवासिनीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास गावातील महिला आणि शेजारील गावातील पाहुणे मंडळी सहभागी झाली होती. यावेळी महिलांनी पुराणपोळीचं जेवण केल्यानंतर 18 ते 19 तासानंतर मळमळणं, उलट्या असा त्रास सुरू झाला होता. यातील काही महिलांना खाजगी दवाखान्यात उपचार केलं. पण त्रास होणं कमी झाला म्हणून बुधवारी सायंकाळी धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आज सर्व बाधित महिला, मुलं आणि पुरुषांची तब्येत ठीक आहे. तर आणखी दोन दिवस त्यांना रुग्णालयात उपचार घ्यावं लागणार असल्याची माहिती, डॉ. प्रशांत रेवाडकर यांनी दिली.
महाप्रसादातून एक हजारहून अधिक भाविकांना विषबाधा : बुधवारी अशीच एक घटना नांदेड येथे घडली होती. लोहा तालुक्यातील कोष्टवाडी गावात जवळपास एक हजारहून आधिक भाविकांना विषबाधा झाली होती. बाळूमामांच्या यात्रेनिमित्त कोष्टवाडी गावात यात्रा भरवण्यात आली होती. जवळपास पाच हजाराहून अधिक भाविक यात्रेला हजर होते. यावेळी महाप्रसादाच्या आयोजन करण्यात आलं होतं. या यात्रेनिमित्त अनेक गावचे भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या धार्मिक कार्यक्रमांमध्ये भगर खाल्ल्यामुळं ही विषबाधा झाली होती. बाधित रुग्णांवर लोहा शासकीय आणि खासगी, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.
हेही वाचा -