ETV Bharat / state

कोल्हापुरातील 'हुपरी'च्या जगप्रसिद्ध चांदीच्या 30 आभूषणांना जीआय मानांकन; चांदीला पुन्हा मिळणार 'झळाळी' - Hupari Silver - HUPARI SILVER

Hupari Silver : रौप्यनगरी हुपरी म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतात ते मनाला भुरळ घालणारे चांदीचे दागिने. सौंदर्यदृष्टीच्या कला रसिकाला येथील दागिने भुरळ घालतात. कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी गूळ यानंतर आता चांदी व्यवसायासाठी संपूर्ण देशभर प्रसिद्ध असणाऱ्या हुपरीमधील (Hupari) एकूण ३० चांदीच्या वस्तू आणि दागिन्यांच्या डिझाईनला (Silver Jewelry) 'जी आय' मानांकन मिळालं आहे.

Hupari Silver
हुपरी चांदी दागिने
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 4, 2024, 7:07 PM IST

Updated : Apr 4, 2024, 11:02 PM IST

'हुपरी'च्या जगप्रसिद्ध चांदीच्या 30 आभूषणांना मिळालं जीआय मानांकन

कोल्हापूर Hupari Silver: चांदी व्यवसायासाठी संपूर्ण देशभर प्रसिद्ध असणाऱ्या हुपरीमधील (Hupari) एकूण ३० चांदीच्या वस्तू आणि दागिन्यांच्या डिझाईनला (Silver Jewelry) 'जीआय' मानांकन मिळालं आहे. येत्या सहा महिन्यात याचं क्लस्टरसुद्धा सुरू करण्यात येणार आहे. चांदी उद्योजक आणि कारागीरांनासुद्धा मोठा फायदा होणार आहे. भौगोलिक चिन्हांकनामुळं जगप्रसिद्ध हुपरीच्या चांदीच्या दागिन्यांना पुन्हा एकदा झळाळी मिळणार आहे.

चांदीच्या आभूषणांना जीआय मानांकन : चांदीचे सुबक आणि आकर्षक दागिने तसंच वस्तू बनवण्यासाठी रजतनगरी म्हणजेच हुपरी ही देशभर प्रसिद्ध आहे. हुपरीच्या आसपासच्या पट्टणकोडोली, इंगळी, तळंदगे, रेंदाळ, यळगूड, रणदेवीवाडी, यासह कर्नाटक राज्यातील मांगुर, बेनाडी, कुन्नूर, बोरगाव अशा विविध गावांमध्ये चांदीचे दागिने आणि वस्तू बनविल्या जातात. जवळपास याला सव्वाशे वर्षांची परंपरा आहे.

असोसिएशन हुपरी स्थापना : चांदी व्यवसायाच्या सर्वांगीण विकासासाठी १९४४ साली चांदी कारखानदारांनी 'असोसिएशन हुपरी' या संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून चांदी व्यवसाय वाढण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. इथल्या कलाकृतीचं नाव जगभर पोहोचावं यासाठी संस्थेच्या वतीनं २०२१ ला असोसिएशननं जीआय मानांकनाची मागणी केली होती. या मागणीनुसार ३० मार्च रोजी ही मागणी मंजूर करण्यात आली. त्यामुळं हुपरीत चांदीपासून बनवलेल्या एकूण तीस चांदीच्या आभूषणांना जीआय मानांकन मिळालं आहे. लवकरच याचं क्लस्टर सुद्धा सुरू करणार असल्याची माहिती, संस्थेचे उपाध्यक्ष दिनकरराव नाईक यांनी दिलीय.

हुपरीचं नाव जगभर पोहचायला होणार फायदा : चांदीच्या ३० प्रकारच्या वस्तू आणि दागिन्यांमध्ये पैंजण, जोडवी, ब्रेसलेट, अंगठी, बाजूपट्टा, कमरपट्टा, पूजा साहित्य, छल्ला, वाळा, बिंदली, करदोडा अशा दागिन्यांचा समावेश आहे. हुपरी आणि त्या आसपासच्या गावात जवळपास सहा ते सात हजार चांदी उद्योजक कार्यरत आहेत. अंदाजे १५ ते २० हजार स्त्री-पुरुष कारागीर या व्यवसायामध्ये आहेत. जीआय मानांकनाचा या सर्वांनाच फायदा होणार आहे. हुपरीचं नाव जगभर पोहचायला आणि व्यवसाय वाढीला याचा फायदा होणार आहे.

जीआय मानांकनासाठी तपासावा लागतो 100 वर्षांपूर्वीचा इतिहास : हस्तकलेतील एखाद्या वस्तूला किंवा कृषी क्षेत्रातील उत्पादनाला भौगोलिक चिन्हांकन मिळण्यासाठी या वस्तू किंवा उत्पादनांचा शंभर वर्षांपूर्वीपासूनचा इतिहास तपासावा लागतो. कोल्हापुरात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत हस्तशिल्प विकास कार्यालय यासाठी कार्यरत आहे. कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातील हस्तक्षेपांना जीआय मानांकन मिळवून देण्यासाठी या कार्यालयानं केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करून कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी गूळ पावडर, यासह अनेक ऐतिहासिक वस्तूंना जीआय मानांकन मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

हेही वाचा -

  1. गोवऱ्या विक्रीतून अमोल खुळे कमवतोय बक्कळ पैसा, बँकेच्या जनरल मॅनेजरची नोकरी सोडून उभारला उद्योग - Business Success Story
  2. जग सोडून गेली असावी म्हणून घरच्यांनी घातलं महिलेचं श्राद्ध; तब्बल 17 वर्षानंतर पत्नी परतल्यावर पतीनं उचललं 'हे' पाऊल - Amravati women story
  3. ''सिड्डू" पिण्याची आग; मेळघाटात मोहफूल वेचण्यासाठी झाडाखाली लावतात आग - Mahua Flowers In Melghat

Last Updated : Apr 4, 2024, 11:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.