ETV Bharat / state

नवीन कायद्याअंतर्गत एका दिवसांत राज्यभरात 244 गुन्हे दाखल; पोलिसांची उडाली तारांबळ - New criminal law Case - NEW CRIMINAL LAW CASE

New criminal law : राज्यात काल एका दिवसात मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात नवीन कायद्याअंतर्गत 244 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील 85 मुंबईत गुन्हे दाखल झाले असून असून त्यातील 27 गुन्हे रेल्वे पोलिसांकडून दाखल झाले आहेत.

New criminal law Case
New criminal law Case (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 2, 2024, 12:19 PM IST

मुंबई New criminal law Case : भारतीय दंड संहिता म्हणजेच आयपीसी मध्ये 511 कलमे आहेत. मात्र 1 जुलै पासून हे आयपीसी आता रद्द झाले. नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे. यामध्ये 358 कलमे आहेत. या नवीन कायद्यांप्रमाणे मुंबईसह राज्यात एका दिवसात 244 गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली आहे.

आयपीसीमधील अनेक कलमांचा बीएनएसमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर काही कलमे नवीन कायद्यात समाविष्ट करण्यात आल्यानं कलमे कमी झाली आहेत. मुंबईत प्रथमच या नवीन कायद्यानुसार सायबर क्राईमचा गुन्हा डी.बी मार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.

पहिल्याच दिवशी 244 गुन्हे दाखल : राज्यात एका दिवसात दाखल झालेल्या 244 गुन्ह्यांपैकी 85 मुंबईत गुन्हे दाखल झालेआहे. त्यातील 27 गुन्हे रेल्वे पोलिसांनी दाखल केले आहेत. मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात दिवसभरात एकूण 244 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्याचा पहिलाच दिवस असल्यानं मुंबईसह राज्यातील पोलिसांची गुन्हे दाखल करताना तारांबळ उडाली होती.

1 जुलैपासून नवीन कायदे लागू : आयपीसी, सीआरपीसी आणि भारतीय पुरावा कायदा या तीन कायद्यांच्या बदली आता भारतीय न्यायसंहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम हे तीन नवीन कायदे एक जुलैपासून लागू झाले आहेत. संपूर्ण देशभरात हे कायदे 1 जुलैपासून लागू करण्यात आले आहेत. मुंबई शहराच्या दाखल झालेल्या 24 गुन्हांपैकी सहा ते सात गुन्हे ऑनलाईन दाखल करण्यात आले आहेत. तर उर्वरित गुन्हे ऑफलाइन दाखल करण्यात आले आहे. मुंबईत भांडुप, एलटी मार्ग, पार्क साईट, भोईवाडा, काळाचौकी, दहिसर, साकीनाका, आर ए के मार्ग आधी पोलीस ठाण्यांमध्ये नवीन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा

  1. अपक्ष उमदेवारानं बिघडविलं गणित, नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किशोर दराडे यांचा विजय - MLC Polls 2024
  2. वर्षातून एकदाच वेलीवर येणाऱ्या 'या' फळाला आषाढी एकादशीत आहे महत्त्व, आरोग्याचे मिळतात आश्चर्यकारक फायदे - Ashadhi Ekadashi 2024
  3. पदवीधर निवडणूक 2024 : मुंबई पदवीधर मतदारसंघातून उबाठा गटाचे अनिल परब विजयी, किरण शेलारांचा केला पराभव - Maharashtra MLC Polls
  4. 'ती' दोन मुलांची आई, तरीही 42 किमीची इंग्लिश खाडी पार करणारी ठरली पहिली भारतीय महिला जलपटू - Tanvi Chavan Devare

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.