ETV Bharat / state

आचारसंहिता सुरू झाल्यापासून राज्यात 23 कोटी रुपये जप्त - मुख्य निवडणूक अधिकारी - Lok Sabha elections - LOK SABHA ELECTIONS

Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत 23 कोटी रुपये जप्त करण्यात आले. तसंच 17 लाख लिटर दारू जप्त करण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिली. तर, गेल्या पाच दिवसात राज्यात एक लाख 84 हजार नव्या मतदारांची नोंद झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

Chief Electoral Officer S Chokalingam
मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 23, 2024, 8:24 PM IST

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची प्रतिक्रिया

मुंबई Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील पहिला टप्पा 19 एप्रिल रोजी सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघांमध्ये निवडणुका होत असून यासाठी अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक 27 मार्च आहे. 28 मार्च रोजी अर्जाची छाननी करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 30 मार्च आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिली आहे. आतापर्यंत रामटेक मतदारसंघात अर्ज एक अर्ज, नागपूर मतदारसंघात पाच, भंडारा गोंदिया मतदारसंघात दोन, गडचिरोली चिमूर मतदार संघात दोन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं.

आचारसंहिता भंगाची कारवाई : राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत 23 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या पैशांची तपासणी सुरू असून त्यात काही गैर आढळल्यास कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. यामध्ये सर्वाधिक साडेतीन कोटी रुपये मुंबई उपनगर जिल्हात आढळले, असं चौकलिंगम यांनी सांगितलं. 17 लाख लिटर दारू आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे, तर 633 किलो अमली पदार्थ जब्त करण्यात आल्याचं ते म्हणाले. 308 परवाना नसलेली शस्त्रे, जप्त करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत 13 हजार 141 व्यक्तींवर कारवाई करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

300 पेक्षा अधिक अर्ज आल्यास मतपत्रिकेवर निवडणुका : राज्यात काही मतदारसंघांमध्ये अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात निवडणूक आयोग सक्षम असून सर्व पद्धतीनं निवडणुका घेण्याची तयारी आहे. तीनशे उमेदवारांपर्यंत ईव्हीएम मशीन वापरू शकतो. त्यापेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यास मतपत्रिकेवरही निवडणुका घेतल्या जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

माध्यम देखरेख नियंत्रण कक्ष : निवडणुकीच्या काळात प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या पेड न्यूज, जाहिराती यांची माहिती देण्यासाठी तसंच नियंत्रण ठेवण्यासाठी माध्यम देखरे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असल्याचं चोकलिंगम यांनी सांगितलं. कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी तिचा मसुदा निवडणूक आयोगाला पाठवणे गरजेचे आहे. या मसुदाला परवानगी मिळाल्यानंतरच जाहिरात छापता येईल, अन्यथा परवानगी न घेतलेल्या जाहिरातींवर कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.

नव मतदारांसाठी नोंदणी सुरूच : राज्यातील नव मतदारांना तसंच स्थलांतरित मतदारांना अर्ज दाखल करण्याच्या 10 दिवस आधीपर्यंत आपलं नाव मतदान यादीत नोंदवता येणार आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच दिवसात पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या पाच मतदारसंघांमध्ये एक लाख 84 हजार 841 मतदारांनी नोंदणी केली असल्याचं चोकलिंगम सांगितलं.

हे वाचलंत का :

  1. अमरावती लोकसभा निवडणूक : आमच्या समोर सर्व पर्याय खुले; अभिजीत अडसूळ यांचा गर्भित इशारा - Amravati Lok Sabha Elections
  2. अरविंद केजरीवालांपाठोपाठ के कवितांचाही पाय खोलात; दोघेही ईडी कोठडीत - Delhi Liquor Policy Scam Case
  3. कल्याणचा सुभेदार कोण? मुख्यमंत्री शिंदे पुत्र की दिवंगत आनंद दिघेंचा पुतण्या? - Kedar Dighe VS Shrikant Shinde

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.