आळंदी (पुणे) Dnyaneshwar Maharaj Palkhi : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी प्रस्थान उद्या शनिवारी (२९ जून) देऊळवाड्यातून होणार आहे. मंदिरातून प्रस्थान आणि पहिल्या मुक्कामातील पाहुणचार घेतल्यानंतर ३० जून रोजी श्रींचा पालखी सोहळा पुणे मार्गे पंढरीला जाण्यास मार्गस्थ होतो. या पार्श्वभूमीवर आळंदी देवस्थानची तयारी पूर्ण झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ महाराज म्हणाले, की यंदाचा १९३ वा पालखी सोहळा आहे. २९ जून रोजी महाराजांच्या पालखीचे दुपारी चार वाजता प्रस्थान होईल. प्रस्थान सोहळ्यासाठी यावर्षी ४७ दिंड्यांना देऊळवाड्यात प्रवेश दिला जाणार आहे. प्रतिदिंडी ९० वारकरीच प्रस्थानासाठी मंदिरात येतील. चांदीच्या रथाला पॅालिश करण्यात आले आहे. देवांचे राजेशाही अलंकार, सरजाम, चांदीची भांडी, सिंहासन सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
महिनाभरापूर्वीपासून सुरू होते रथदुरुस्तीचे काम : या वर्षीचा पालखी सोहळा विशेष आहे. कारण दोन वर्षे कोरोनामुळे पायी पालखी सोहळा झालाच नाही. त्यामुळे यंदा सोहळ्यात गर्दी वाढणार आहे. पालखी सोहळ्याची जी तयारी असते, त्यात संस्थानची स्वत:ची जी तयारी असते ज्यात रथ दुरुस्ती, पालखी दुरुस्ती आदी कामे महिनाभर अगोदरच सुरू होतात. मुख्य म्हणजे, संस्थानाचे जे दोन अडीचशे लोक, येणारे पाहुणे यांच्याकरिता जेवण वगैरेचं साहित्य आम्ही अगोदरच महिनाभर खरेदीस सुरुवात करतो. यामध्ये पूजेचे साहित्य, रोजच्या नैवद्याचे पाच पक्वान्न आदींचा समावेश असतो. हा नैवद्य बनविण्यासाठी दोन महिला असतात. त्या सोवळे नेसून रोज हा पाच पक्वान्नाचा नैवैद्य बनवितात.
सुरक्षेचा चोख बंदोबस्त : श्री गुरू हैबतबाबांनी ठरवून दिलेले प्रथेप्रमाणे सोहळा पार पडेल. देवस्थान प्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, दिंडीकरी, फडकरी, मानकरी, पोलीस यंत्रणा, गावकऱ्यांसमवेत बैठका झाल्या आहेत. आता प्रस्थान सोहळ्याची प्रतीक्षा आहे. देवस्थान प्रतिनिधी प्रशासनाच्या सतत संपर्कात आहेत. वारकऱ्यांसाठी पाणी, सुरक्षेची व्यवस्था केली गेली आहे. प्रशासनाकडून वैद्यकीय मदत पुरविली जात आहे. १४० वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध आहेत. शासनाचे चांगले सहकार्य मिळत आहे. पहिल्या विसावाच्या तयारीचा आढावा घेतला आहे. पहिल्या विसाव्यातील श्रींच्या पादुका पूजन, आरती प्रसंगी मंदिरात केवळ पासधारकांनाच सोडण्यात येणार आहे. अनावश्यक गर्दी करू नये, असं आवाहनही आळंदी देवस्थानाच्यावतीनं करण्यात आलयं.
भाविकांसाठी आवश्यक बाबींची पूर्तता : पालखीच्या मार्गावर भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याकरिता टँकर उपलब्ध केले आहेत. सिद्धबेट, नदी घाट, नवीन पुलासह संपूर्ण महत्त्वाच्या ठिकाणीची स्वच्छता पूर्ण झाली आहे. वारी कालावधीत तीन पाळ्यांमध्ये साफसफाई केली जाणार आहे. १८०० फिरत्या शौचालयांची उपलब्धता केली आहे. दिवाबत्तीची कामे पूर्ण झाली आहे. ६० ठिकाणी १३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तीन बोट तैनात ठेवल्या आहेत.
दररोज ३०० लोकांचा स्वयंपाक : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी सुमारे अडीचशे ते तीनशे भाविकांसाठी स्वयंपाक केला जातो. त्यात पोळी भाजी, आमटी, भात असतो. सगळ्या प्रकारची लोणची, चटण्या आम्ही सोबत घेतो. वाटेने शक्यतो काही खरेदी नसते. पॅकिंगमधील प्रत्येक वस्तूवर ते किती किलो वगैरे आहे, हे लिहिले जाते. अडीचशे-तीनशे लोकांमध्ये सेवक असतात. कुणी तंबू ठोकणारे, कुणी पालखीत बसणारे असतात. वैशिष्ट्य म्हणजे, आळंदी गावातील रथाची समिती आहे. ही समिती माऊलींच्या रथासाठी बैलजोडी पुरविते. आम्ही संस्थानतर्फे प्रकाशित ज्ञानेश्वरीच्या प्रतीही सोबत घेतो. ती अल्प किंमतीत म्हणजे ५० रुपयांना देतो. ही ज्ञानेश्वरी घरोघरी पोहोचावी म्हणून १० रुपयांपासून ते अगदी एक लाखापर्यंत देणग्या मिळतात. देणगीदारांना प्रसाद म्हणून साखरफुटाणे, शाल, श्रीफळ दिले जाते.
तीन जिल्ह्यांचे जिल्ह्याधिकारी घेतात मिटिंग: पूर्वी पालखीसोबत बैलगाड्या होत्या, एक ट्रक होता. आता पाच हजार गाड्या आहेत. पूर्वी रॉकेलच्या बत्त्या होत्या. आता इलेक्ट्रिकचे दिवे आले. शासनाकडून आम्हाला त्याचा पुरवठा होतो. पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी पुणे, सातारा, सोलापूर या तीनही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी मीटिंग घेतात. त्यात सोहळ्याचे विश्वस्त सहभागी होतात. हा सोहळा राज वैभवाचं प्रतीक म्हणून ओळखल्या जात असल्याने माऊलींच्या नित्योपचासाठी, नैवेद्यासाठी वापरण्यात येणारी चांदीची भांडी आणि खास चांदीचे सिंहासन त्याच बरोबर माऊलींच्या पालखी रथा सोबत जाणाऱ्या दैनंदिन वापरातील ह्या वस्तू यात अनेक छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या वस्तू पर्यंत सर्व गोष्टीचा समावेश असणाऱ्या कोटी घराची ही खास दृश्य आहेत. माऊलींच्या पालखी सोहळ्यात ३० जून ते ३१ जुलै पर्यंत या वस्तूंचा वापर करत दररोज ४०० लोकांच्या महाप्रसादाची व्यवस्था केली जाते.
हेही वाचा:
- स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भयाण वास्तव; रस्त्याअभावी गरोदर महिलेला झोळीतून रुग्णालयापर्यंत नेण्याची वेळ - Pregnant Women
- गृहिणींचं बजेट कोलमडलं; चिकनपेक्षा शेवगा महाग, इतर भाज्यांचे दरही शंभरी पार - Vegetable Rates Hike
- तर अशा मनुस्मृतीचे धडे आपण विद्यार्थ्यांना देणार का? जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले - Awhad On Manusmriti