ETV Bharat / state

बिबट्याच्या हल्ल्यात गुराखी ठार; गायी चारायला गेला अन् परतलाच नाही, नागरिक हादरले - Youth Died In Leopard Attack - YOUTH DIED IN LEOPARD ATTACK

Youth Died In Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात दिंडोरी तालुक्यातील वानरवाडी इथं 16 वर्षीय विठ्ठल पोद्दार हा तरुण ठार झाल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हा तरुण मूळचा गुजरात राज्यातील असून तो गायी चारायला जंगलात गेला होता.

Youth Died In Leopard Attack
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2024, 11:50 AM IST

नाशिक Youth Died In Leopard Attack : दिंडोरी तालुक्यातील वानरवाडी गावात राहत असलेला 16 वर्षीय तरुण बिबट्याच्या हल्ल्यात जागीच ठार झाला. गायी चारायला गेलेला हा तरुण घरी परतलाच नाही, त्यामुळे नागरिकानी शोध घेतला. मात्र त्याला बिबट्यानं ठार केल्याचं उघड झालं. विठ्ठल पोद्दार असं या बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या तरुणाचं नाव आहे. विठ्ठल हा मूळचा गुजरात राज्यातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याची दहशत असून वन विभागानं या भागात पिंजरे लावावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली. बिबट्याच्या हल्ल्यात तरुण ठार झाल्यानं परिसरात मोठी दहशत पसरली आहे.

गायी चारण्यासाठी गेला तरुण : मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वानरवाडी गावात विठ्ठल पोद्दार( वय 16 वर्ष, मूळ राहणार भाद्रपाडा, गुजरात) हा गावातील बबन डमाळे यांच्या शेतात 22 तारखेला दुपारी गायी चारण्यासाठी गेला होता. सायंकाळी गाई घराकडं आल्या, मात्र विठ्ठल आला नाही. त्यामुळे बबन डमाळे यांनी त्याचा शोध घेतला असता, बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात विठ्ठल जागीच ठार झाल्याचं उघड झालं. त्यामुळे बबन डमाळे यांना मोठा धक्का बसला. ही घटना सरपंच दत्तू भेरे यांनी पोलीस आणि वन विभागाला कळवली. यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत विठ्ठलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.

बिबट्याचे हॉटस्पॉट : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, दिंडोरी, इगतपुरी, मालेगाव, चांदवड, त्र्यंबकेश्वर हे तालुके बिबट्याचं हॉटस्पॉट म्हणता येईल. या तालुक्यातून गोदावरी, दारणा आणि कादवा या नद्या प्रवाहित होत असून या नद्यांच्या आजुबाजूला उसाचं मोठं क्षेत्र आहे. अशात बिबट्यांना लपण्यासाठी आणि प्रजननासाठी उसाचं शेत ही सुरक्षित जागा असल्यानं बिबट्याच्या वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो. या सोबत मुबलक पाणी आणि गावात भक्ष्य म्हणून बिबट्यांना शेळ्या-मेंढ्या तसेच भटकी कुत्री मिळत असल्यानं बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.

अशी घ्यावी काळजी : नाशिक जिल्ह्यात उसाचं क्षेत्र बिबट्यांना लपण्यासाठी ही चांगली जागा असते. ऊसतोड करताना अनेकदा माणसांवर बिबट्यांचे हल्ले होत असल्याचं दिसून आलं आहे. अशात शेतकऱ्यांनी, मजुरांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे. ऊस तोड सुरू असल्यास बाजुला शेकोटी पेटती ठेवावी, ज्यामुळे बिबटे, लांडगे, तरस वन प्राणी जवळ येणार नाहीत. अनेक वेळा लहान मुलांवर बिबटे हल्ले करत असल्याचं दिसून आलं आहे. अशात पालकांनी काम करताना आपल्या मुलांची विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन वन विभागानं केलं आहे.

हेही वाचा :

  1. बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; गावावर शोककळा, ग्रामस्थ संतापले - Leopard Attack On Child
  2. मोहाडी गावात बिबट्याचा थरार; सहा जणांवर केला हल्ला, गावात तणाव - Leopard caged in Chandrapur
  3. दुचाकीवरुन जाताना किर्तनकार महाराजांवर बिबट्याचा हल्ला, महाराजांसह बिबट्याही जखमी - Bhagwat Prakash Tikhandke

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.